डोंबिवली :- ( शंकर जाधव ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काल मध्यरात्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.रिपाईचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी डोंबिवली महापालिकेच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.यावेळी रिपाईचे डोंबिवली शहर कार्याधक्ष किशोर मगरे, सचिव दिनेश साळवे, युवा शहर अध्यक्ष सतिश पवार, उपाध्यक्ष वसंत टेकाळे,संपर्क प्रमुख तुकाराम पवार, संघटक समाधान तायडे, उपाध्यक्ष काकडे, डोंबिवली पुर्व अध्यक्ष विठ्ठल खेडकर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा डोंबिवलीत उभारण्यात आल्या मुळे डोंबिवलीतघल आंबेडकरी जनतेला अभिवादन करणे सोयीचे झाले.त्यामुळे मध्यरात्री शहरातील अनेक भागातील आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणात येथे जमा झाली. येथे पुतळा व्हावा यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सातत्याने प्रयत्न आम्ही केला होता.असे रिपाईचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
December 6, 2018
58 Views
1 Min Read

-
Share This!