अंबरनाथ दि. ०६ (नवाज अब्दुलसत्तार वणू) समाजात महिलांवरील अत्याचा हा समाजापुढील मोठी समस्या झाली आहे. महिलांना समान हक्क असले तरी समाजातील अपप्रवृत्ती आजही महिलांवर अन्यात आणि अत्याचा करित आहेत. कौटुंबिक वादातुनही महिलांना मोठय़ा प्रमाणात त्रस सहन करावा लागत आहे. महिलेच्या शरिरापेक्षा मनावरील घाव महिलांना असाह्य करित असतात. त्यातुन सुटका करण्याची वेळ आली असुन समाजाने देखील त्यासाठी हातभर लावावे असे आवाहन अभिनेत्री अलका कुबल यांनी केले.
अंबरनाथ नगपरिषदेच्या महिला बालकल्याण आणि तालुका विधी सहाय्यक समितीच्या पुढाकाराने महिला अत्याचार रोखण्यासाठी ‘महिला सक्षमिकरण’या विषयावर चर्चा सत्रचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिनेत्री अलका कुबल, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पाटील, नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, सभापती रेश्मा काळे आणि पालिकेच्या विधी सल्लागार अॅड. साधना निंबाळकर उपस्थित होते. अंबरनाथ रोटरी क्लबच्या खुल्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आले. महिलांशी निगडीत विषय असल्याने महिलांनी देखील मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्री कुबल यांनी चित्रपटातील भूमीका आणि वास्तवातील भूमीका यात काही फरक जाणवत नाहीत. अनेक चित्रपटात महिलांवरील अत्याचाराच्या भूमीका आपण बजावले आहेत. चित्रपटातील या भूमीका समाजात देखील घडत असतात. त्यामुळे आता समाजाची प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे. महिला सर्व क्षेत्रत पुढे असले तरी आजही मुलीच्या जन्माचे हवे त्या मनाने स्वागत केले जात नाही. मुलीचा जन्म झाल्यावर मुलगा हवा होता ही प्रतिक्रीया स्वत: महिलाच देत आहेत. महिलाच जर मुलींच्या जन्माचा सन्मान करित नसेल तर मग समाज सुधारण्याची इच्छा कोणाकडे व्यक्त करावे असा प्रश्न पडत आहे. मुलगा आणि मुलींमधील भेद कमी झाले तर जमाजात काही प्रमाणात बदल घडतील. आज अनेक वृध्द आई वडील हे वृध्दाश्रमात आपले जिवन जगत आहे. ती परिस्थिती पाहिल्यावर असे वाटते की मुलाच्या स्वरुपात वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच्या रुपात प्रकाश देणारी पणतीच बरी असे मत कुबल यांनी व्यक्त केले.
यावेळी महिलांना कायदेविषयक आणि पोलीसांची भूमीका याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पाटील यांनी महिलांना दिले. महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहे. महिलांनी या बदललेल्या कायद्यांची माहिती घेणो गरजेचे आहे. आज कायदा हा महिलां संरक्षण देत आहे. मात्र त्या कायद्याचा गैरवापर होता कामा नये. आज महिलांकडे चुकीच्या नजरेने पाहणा-यालाही शासन होऊ शकतो. अत्याचाराच्या घटनेत पूर्वी 7 वर्षाची शिक्षा होती. मात्र आता त्यात बदल केले असुन अत्याचार प्रकरणात 2क् वर्षाची शिक्षा आणि गभिर स्वरुपाच्या अत्याचाराच्या घटनेत जन्मठेप आणि फाशीची शिक्षा देखील देण्यातची तरतुद आहे. कायद्यात झालेले हे बदल महिलांना संरक्षण देण्यासाठीच केले आहे. महिलांवर कोठेही अन्यात किंवा अत्याचार होत असेल तर त्यांनी लागलीच तक्रार देणो गरजेचे आहे. अत्याचाराची तक्रार लागलीच केल्यास आरोपीला योग्य शासन करणो शक्य होते. महिलांनी तक्रारीसाठी पुढे येणो गरजेचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी कैटुंबिक वाद हा घरातील दोन महिलांमधील मानसीक दुराव्याचे परिणाम आहेत. कुटुंब व्यवस्था सांभाळण्यासाठी घरातील महिलांनी महत्वाची जबाबदारी पार पाडणो गरजेचे आहे. अनेक वाद सामजस्याने घेतल्यास ते पोलीस ठाण्यार्पयत येणारही नाहीत. घरातल्या घरातही वाद मिटविणो शक्य आहे. येवढेच नव्हे तर घरात वाद मिटत नसले तर तालुका विधी सहाय्यक समितीच्या पी.व्ही.एल. सदस्यांच्या सहकार्याने हे वाद मिटविणो शक्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या विधी सल्लागार अॅड. साधनाल निंबाळकर यांनी महिला अत्याचाराच्या घटनांममध्ये होणारे वाढ ही सामाजिक समस्या झाली आहे. कौटुंबिक वादातुन होणारे अत्याचार असो वा समाजात वावरत असतांना महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी कायद्यात अनेक दुरुस्ती करण्यात आली आहे. महिलांनी अत्याचाराच्या घटनेत स्वत:ला सावरण्यासोबत वेळेत तक्रार करणो गरजेचे आहे. तक्रारीमुळे अत्याचार करणा-यांना शासन करणो शक्य होणार आहे. महिलांनी आपले अस्तित्व जपतच समाजात वावरणो गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी अत्याचार होत असेल तर त्याची तक्रार लागलीच करणो गरजेचे आहे, पोलीसांकडे आणि न्यायालयात कौटुंबिक वादांचे अनेक प्रकरणो प्रलंबित आहेत. या वादांचे प्रमाण वाढत असल्याने पीएलव्ही सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे या तक्रारी गेल्यास हे वाद पोलीस ठाणो आणि न्यायालयात जाण्या आधीच सुटण्यास मदत होईल असे मत निंबाळकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. बालाजी किणीकर, सभापती रेश्मा काळे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक काशिनाथ चव्हाण, पीएलव्ही सदस्य संदा गान, स्नेहल उपासणी, गुलाब जाधव, राजेश चव्हान, सुप्रिया देसाई, विजय पवार, निखील वाळेकर, पंकज पाटील आणि सुभाष साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.