डोंबिवली :- ( शंकर जाधव )डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील ब्रिज खाली रस्त्यावर उघड्यावर दारू पिण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्यावर सोमवारी रात्री आठ वाजता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी जाऊन दारुड्यांना चोप दिला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जगदीश ठाकूर, राजेंद्र नांदोस्कर ,न्यानेश पवार, निरंजन भोसले, सुरेश भोसले, समीर भोईर यांनी सोमवारी रात्री आठ वाजता डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील ब्रिजखाली दारू पित बसलेल्या दारुड्यांना चांगलाच चोप दिला.यावेळी जगदीश ठाकूर यांनी डोंबिवलीत सुरक्षित नसल्याचे सांगत यावरून दिसून येत असून जर राष्ट्रवादी हे काम करु शकते तर पोलीस हे काम का करू शकत नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.चार- पाच दिवसात हे प्रकार थांबले नाही तर राष्ट्रवादी पुन्हा सदर ठिकाणी दारुड्याना पुन्हा चोप देऊ असेही ठाकूर यांनी सांगितले.