दिवा (बातमीदार) – अंबरनाथ मधील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना एका युवकाने धक्का बुक्की करून कानसुलात लगावण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्त दिव्यात सायं 7.30 मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आठवले साहेब आगे बधो हम तुम्हारे साथ हे व निषेध निषेध या घोषणांनी दिव्यातील शिवाजी महाराज चौक गाजला.
अंबरनाथ येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि सुमेध भवार युथ फाऊंडशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव दिन आणि बहुजन महोत्सवा चे आयोजन येथील नेताजी मैदान येथे करण्यात आले होते, या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत होते, याच वेळी एका युवकाने मंचकावर जाऊन आठवले यांना धक्का बुक्की केली व कानसुलात लागवण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने कार्यक्रमात प्रचंड गोंधळ मजला व ज्या युवकाने हा प्रकार केला त्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला, हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या मोर्चात एकनाथ- अध्यक्ष( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- दिवा), दिनेश पाटील- कार्यालय अध्यक्ष, विश्वास भालेराव (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष) सचिन नाईक, अशोक तांबे, जयसिंग कांबळे, अनिल कांबळे, गंगाधर मोरे, अनिल काळे, प्रकाश जाधव, बालाजी कदम इ. भीमसैनिक सहभागी झाले होते. हा मोर्चा दिवा स्टेशन,पूर्व ते शिवाजी महाराज चौक, दिवा टर्निंग पर्यंत काढण्यात आला. तसेच आठवले साहेबांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध करुन हल्ला करणाऱ्या माथेफीरुला अटक करुन चौकशी करावी, तर अशा हल्ला पासून संरक्षणासाठी झेड सुरक्षा देण्याची मागणी एपीआय शिंदेना दिवा चौकीत पत्र देऊन भिमसैनिकांनी केली आहे.