ठाणे

सैनिकांविषयी कृतज्ञतेच्या भावनेतून ध्वज दिन निधी संकलन अधिकाधिक व्हावे – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे : आपले सैनिक सीमेवर खडा पहारा देत असल्यामुळे आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन निधी संकलन होय, त्यामुळे या निधी संकलनाकडे आपण एरव्हीच्या एखाद्या उद्दिष्ट्यपूर्ती मोहिमेसारखे पाहू नये व अधिकाधिक निधी संकलित करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन २०१८ चा शुभारंभ आज सकाळी १० वाजता नियोजन भवन सभागृह येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त युनिटी फौंडेशनचे दिलीप गुप्ते यांनी संकलित व संपादित केलेल्या महारथी या पुस्तकाचे प्रकाशनही विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील यांची उपस्थिती होती.

ध्वजदिन निधीसाठी गेल्या वर्षभरात १ कोटी ८४ लाख इतके उद्दिष्ट्य होते, पैकी ८५ टक्के म्हणजे १ कोटी ५८ लाख इतका निधी गोळा झाला. याबद्धल मान्यवरांच्या हस्ते उत्तम निधी संकलनाबद्धल उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी तसेच इतर अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

माजी सैनिकांच्या आरोग्य योजनेबाबत लागणाऱ्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे तसे निर्देश ठाणे तहसीलदार यांना दिले आहेत असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

याप्रसंगी प्रारंभी द्वीप प्रज्वलन करण्यात आले तसेच प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीर जवानांच्या स्मृतीला वंदन करण्यात आले. वीर माता व वीर पत्नींचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मान्यवरांनी ध्वज दिन निधी संकलनात आपले योगदान दिले.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजळ जाधव यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले.

महारथी या पुस्तकात महाराष्ट्रातील १०८ शौर्य सन्मान प्राप्त सैनिकांच्या शौर्यगाथा शब्दबद्ध केल्या आहेत. या शौर्यगाथा प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित असल्याने वाचकांना खूपच प्रेरणादायी ठरतील आणि देशासाठी लढणाऱ्या सैनिकांप्रती आपला आदर अधिक वाढेल तसेच भारतीय सैन्य दल देश संरक्षणासाठी आपल्या जीवाची कशी बाजी लावते ते कळेल असे दिलीप गुप्ते यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजळ जाधव यांनी या पुस्तकासाठी खूप प्रोत्साहन दिले असे सांगून दिलीप गुप्ते यांनी या पुस्तक विक्रीतून मिळणारी रक्कम सैनिक कल्याण निधीला देण्याचा मानस व्यक्त केला आहे. सुमारे २०० पानी या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाची किंमत २२५ रुपये असून त्यांचा संपर्क क्रमांक २५४४४८८५ असा आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

ठाणे

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरघर तिरंगा अभियान सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील आद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळांची दयनीय अवस्था ?जिल्हाधिकां-याचा सकारात्मक प्रतिसाद !

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!