डोंबिवली : – ( शंकर जाधव ) विविध राज्यातील सार्वत्रिक निवडणुकांत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसने जल्लोष केला. निवडणुकीतील भरघोस यशाबद्दल काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्याकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. ढोल-ताशे वाजवत, पेढे वाटून आणि फटाके फोडून काँग्रेसने विजय साजरा केला.
नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा मिझोरम या ५ राज्यांपैकी ३ राज्यांत काँग्रेसची सत्ता आली. या पार्श्वभूमीवर डोंबिवली पश्चिमे कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी ब्लोक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे,महिला उपाध्यक्षा वर्षा गुजर, युवक अध्यक्ष राहुल काटकर, शिला भोसले, दीप्ती दोषी,बेबी परब,वंदना जगताप,सुभाष म्हात्रे,गणेश माळी,स्वप्नील छत्तीसकर, निवृत्ती जोशी, अभय तावडे, विद्याधर दळवी, अजय महाजन, राजेश म्हात्रे, भावेश म्हात्रे , अश्वाजित काठे आदीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. तर डोंबिवली पूर्वेकडील
कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसचा जल्लोष

इंदिरा गांधी चौकात काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे, प्रदेश प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे, नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, एकनाथ म्हात्रे, हर्षद पुरोहित, राधिका गुप्ते आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.११डिसेंबर रोजी एक वर्षापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाची शपथ घेतली होती.त्यांची शपथ संजीवनी ठरली आहे.राहूल गांधी यांनी जी मेहनत घेतली त्यामुळे तीन राज्यात सत्ता आली .मोदी सरकार कडून ज्या आश्वासनांची पुर्तता हवी होती ती झाली नाही, असे काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक नवीन सिंग यांनी यावेळी म्हणाले. तर कल्याणमध्ये प्रदेश कमीटीचे सचिव आणि तमिळनाडूचे प्रभारी संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण शहर जिल्हा काॅग्रेस कमीटीने विजयाचा जल्लोष साजरा केला. या प्रसंगी कल्याण-डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, सुरेंन्द्र आढाव, जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल काटकर आणि कार्यकर्त्यांनी पेढे वाटून उत्साह साजरा केला.