डोंबिवली :- ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदानात पार पडलेल्या सीएम चषक खो- खो स्पर्धेत डोंबिवलीतील पहिली मराठी शाळा असलेले स.वा.जोशी शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाने आक्रमक खेळ करत संघर्ष क्रीडा संघावर मात केली.या स्पर्धेत २६ संघातील ४३२ खेळाडूंनी भाग घेतला होता.पार पडलेल्या विविध गटातील खेळाडूंनी नेत्रदीपक खेळ करून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
दिवसभर चाललेल्या रंगतदार सामन्यात मुले आणि मुलींच्या वेगवेगळ्या गटातील खेळाडूंनी एकमेकांच्या संघावर मात करत सायंकाळी अंतिम सामन्यापर्यत पोहोचले. अंतिम सामन्यात १४ वर्षाखालील मुलांच्या गटात डोंबिवलीतील स.वा.जोशी शाळेतील खो-खो संघाने संघर्ष क्रीडा मंडळाचे आव्हान संतुष्टात आणले. महिला संघाच्या अंतिम सामन्यातील संघर्ष क्रीडा मंडळाने विजय मिळविला. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रगती स्पोर्ट क्लबच्या खेळाडूंनी दर्जेदार खेळ करत क्रेझी बॉईज खो- खो संघावर सहज विजय मिळविला.१७ वर्षाखालील मुलीच्या गटात डोंबिवलीतील स.वा.जोशी शाळेतील मुलींनी सुरेख खेळाचे प्रदर्शन करत प्रगती स्पोर्ट क्लबला पराभूत केले. १९ वर्षाखालील मुलांच्या संघात अंतिम सामन्यात पोहचलेल्या संघर्ष क्रीडा आणि जी.पी.एम संघात अतितटीचा सामना पहावयास मिळाला. संघर्ष क्रीडा संघातील खेळाडूंनी जी.पी.एम संघास अंतिम सामन्यात लोळवून सीएम चषकावर मोहोर उमटविली. मुलीच्या १७ वर्षावरील मुलींच्या गटात स.व. जोशी शाळेच्या खो-खो खेळाडू मुलीनी प्रगती स्पोर्ट कलबवर मात केली. विजयी व उपविजेते संघास रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. संघर्ष क्रीडा मंडळाच्या महेश मयुराडे या खेळाडू याला सर्वोष्ट खो-खो खेळाडू म्हणून मान मिळाला. तर मुलीच्या गटात प्रगती क्रीडा संघाच्या भूमिका दळवी हि सर्वोष्ट खेळाडू ठरली. डोंबिवलीतील स.वा.जोशी शाळेतील आशिष प्राची जाधव हिला सर्वोष्ट खेळाडू मान मिळाला. स्पर्धेत पंच म्हणून संजय मदराळे आणि सागर पवळ यांनी काम पहिले. या स्पर्धेचे संयोजन स्थानिक भाजप नगरसेविका विद्या म्हात्रे केले होते. यावेळी भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस राजेश म्हात्रे, नगरसेविका वृषाली जोशी, नगरसेवक मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक,डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश प्रभूघाटे,शहर महिला अध्यक्षा निशा कबरे, पूनम पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष पवन पाटील, प्रदीप चौधरी, संजय नायर, सुजित महाजन, कृष्णा परूळेकर,रुचिता चव्हाण, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.