ठाणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबरनाथ विधानसभा अध्यक्षपदी पुष्पराज (गणेश) गायकवाड यांची निवड

अंबरनाथ दि. १२ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
          राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ विधानसभा अध्यक्षपदी  पुष्पराज (गणेश) गायकवाड यांची नुकतीच जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी निवड केली आहे. तसे नियुक्तीपत्र माजी पालकमंत्री तथा लोकनेते गणेश नाईक यांच्याहस्ते नुकतेच देत अंबरनाथ विधानसभेची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली आहे.
          याप्रसंगी माजी पालकमंत्री तथा लोकनेते गणेश नाईक यांच्यासमवेत अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार आदी उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षपदी गणेश गायकवाड यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार व सोशल मीडिया सेलचे तालुका विधानसभा अध्यक्ष मिलिंद मोरे यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
         पक्षाने माझ्यावर अंबरनाथ विधानसभेच्या अध्यक्ष पदाची जी जबाबदारी सोपविलेली आहे. ती मी योग्यरीतीने सांभाळून पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे ध्येय मी सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम करून पक्ष वाडीस काम करिन. असे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड यांनी सांगितलं.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!