ठाणे : आजचे विद्यार्थी उद्याचा भारतीय नागरिक आहे. त्यामुळे विद्यार्थीदशेत आचरणात आणलेल्या चांगल्या गोष्टी भविष्यासाठी हितकारक ठरतात. सदर बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व कायदा यांची माहिती मिळण्याकरिता (ज्ञान) ठाणे वाहतूक विभागाने अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात के. बी. पी. महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालय व ठाणे महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियम व कायद्याच्या जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस सह आयुक्त मधुकर पाण्डेय, पोलीस उपायुक्त काळे यांनी भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.