डोंबिवली : ( शंकर जाधव ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या हस्ते उद्या शनिवारी सकाळी साडे वाजता डोंबिवलीत विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांच्या राजाजी पथ येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता सुनील नगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या `राजगड` जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.मोदीमुक्त भारत हा नारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यातच येत्या मंगळवारी १८ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदीं कल्याणमध्ये मेट्रोच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पंतप्रधान मोदींवर टीका करणार का ? महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीबाबत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थनिक पातळीवर आपल्या पक्षाची नेमकी काय स्थिती आहे याचाही ते आढावा घेणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या डोंबिवलीत
December 14, 2018
114 Views
1 Min Read

-
Share This!