उल्हासनगर : चाकीवरून आलेल्या दोघांनी कॉलेजच्या तरुणीची सोनसाखळी लांबवल्याचा प्रकार उल्हासनगर मध्ये समोर आला आहे.
सोनसाखळी लांबवल्याचा हा प्रकार रस्त्याशेजारी असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
कॅम्प नंबर ३ च्या विठ्ठलवाडी स्टेशन रोड परिसरात दिवस ढवळ्या हा सगळा प्रकार घडला आहे.वेदांत कॉलेज मधील इयत्ता १४ वी या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी दुपारच्या सुमारास कॉलेज संपून आपल्या दोन मैत्रिणींसोबत घरी निघाली होतो.त्याच वेळेस मागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने या विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवून धूम ठोकली.या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान आता या cctv च्या मदतीने पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.