मुंबई

हवालदार शैलेश मोहिते यांच्या मुलाचा सत्कार ; माजी पोलीस आयुक्त रिबेरो यांनी 1 लाखाचा धनादेश देऊन केला गौरव

मुंबई : पोलीस पाल्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी माजी पोलीस आयुक्त श्री. रिबेरो यांच्या संकल्पनेतून पोलीस पाल्यांचा सत्कार केला जातो. यंदाच्या वर्षीय 13 पोलिसांच्या पाल्यांनी सत्कारासाठी अर्ज केला होता. मात्र त्या सर्व पाल्यांमध्ये सरस ठरलेल्या हवालदार शैलेश खंडेराव मोहिते यांचा सुपुत्र सिद्धेश याची सत्कारासाठी निवड करण्यात आली. सिद्धेश यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम गुण मिळवल्याने माजी पोलीस आयुक्त श्री. रिबेरो यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश, पुष्पगुच्छ व “बुलेट फॉर बुलेट” (लेखक – जे. एफ. रिबेरो, अनुवाद मंजिरी दामले) भेट दिले. हा सत्कार समारंभ 14 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील फ्रॅंक सूटर सभागृहात झाला.

या कार्यक्रमाला मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त (प्रशासन) संतोष रस्तोगी व अन्य पोलीस अधिकारी, अमलदार, पोलीस कुटुंबीय उपस्थित होते.
शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदार पदापासून ते पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील पोलिसांच्या पाल्यांचा गेल्या 2 वर्षांपासून माजी पोलीस आयुक्त सत्कार करत आहे. सन 2018 वर्षात पोलीस पाल्यांच्या सत्कारासाठी अर्ज मागवण्यात आले होते. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या १३ पोलीस पाल्यांचे अर्ज सत्कारासाठी आले. त्या अर्जांमध्ये देवनार पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या शैलेश मोहिते यांचा मुलगा सिद्धेश सरस ठरल्याने त्याची सत्कारासाठी निवड करण्यात आली.
सिद्धेश शैलेश मोहिते हा लोकमान्य टिळक मेडिकल महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. मेडिकल सायन्स विभागासाठी प्रवेश (नीट) परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत सिद्धेश याने ९९.६४ (प्रसनटाईल) गुण प्राप्त केले. या परीक्षेला देशभरातील साडेबारा लाख विद्यार्थी बसले होते. शैलेश याला इयत्ता १० वीला ९३% तर १२ वीला ८०% गुण मिळाले होते. शैक्षणि क्षेत्रात केलेल्या या उत्तम कामगिरीसाठी सिद्धेश याचा माजी पोलीस आयुक्त श्री. रिबेरो यांनी १ लाख रुपयांचा धनादेश, पुष्पगुच्छ व बुलेट फॉर बुलेट हे पुस्तक भेट देऊन सत्कार केला. देवनार पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले शैलश मोहिते यांची पत्नी सुनंदा या इंजिनीअर आहेत तर मुलगी श्रीअंजली डॉक्टर (बीडीएस) आहे.
दरम्यान, या प्रसंगी अर्ज करणारे पोलीस पाल्य निखल प्रल्हाद शिरसाट, प्राजक्ता प्रदीप मोरे, संदीप सुरेश आव्हाड, सुखाजी तानाजी सावंत, लोमेश राजेंद्र वाघ, केतकी बलराज साळोखे, रोहित भगवान पवार, सुजाल एकनाथ बडवे, जय रमेश माळवे, भक्ती भास्कर खामकर, अपूर्वा महेश पाटील, रोनक नितीन सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!