अंबरनाथ दि. २५ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
कै. श्यामलदास बाबाजी यांच्या पुण्यतिथी निमित्त “मोफत नेत्र तपासणी शिबीर” व “अल्प दरात चष्मे वाटप” आणि “वरिष्ठ नागरिकांना मोफत चष्मा वाटपाचा” कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील नगरसेविका सौ. श्रुती सुरेश सिंह यांच्या जनसंपर्क कार्यालय, दुर्गा मंदिराजवळ, बुवापाडा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका श्रुती सुरेश सिंह व अंबरनाथ शहर युवक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सुरेश (मनोज) सिंह यांनी केले होते.

या तपासणी शिबिरात बुवापाडा परिसरातील हजारो नागरिकांनी तपासणी करून घेतली व अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच वरिष्ठ नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आल्याचे आयोजक नगरसेविका श्रुती सिंह व मनोज सिंह यांनी सांगितलं. याप्रसंगी येथील मनीष सिंह यांच्यासह संघटन बाईजचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.