ठाणे : कष्टाने पैसे कमावून घेतलेल्या गाड्या अशा चुटकीसरशी जाळून टाकण्यात आरोपींना काय आय आनंद मिळतो हेच समजत नाही , ठाण्यामधे मोटार सायकली जाळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत 2017 च्या जुलै महिन्यात अशाच मोटार सायकली नितीन कंपनी जवळ जाळल्या होत्या , त्यानंतर 6/12/2012म्हणजे याच महिन्यात पहाटे 3 वाजता नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतच कौशल्या हॉस्पिटल समोर 9 मोटरसायकल जाळल्या होत्या , आणि आता 25 तारखेच्या सकाळी 2:30 दरम्यान चंदनवाडी पांचपाखाडी येथे 18 मोटरसायकल जाळण्याची घटना घडली आहे , एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आजूबाजूच्या परिसरात या गाड्या जाळण्याचा घटना घडत आहेत , याला आपल्याच समाजातील काही वीक्रुत इसम जबाबदार आहेत , अगोदरच्या दोन्ही घटनेतील आरोपींना पोलीसांनी पकडले असुन ते अजुन जेल आहेत , पोलीस आपल काम चोख करतात पण आपल्याच समाजातील काही समाजकंटक अशा घटना वारंवार घडवून आणत आहेत , ह्या गाड्या जाळणाऱ्या लोकांना कायद्याची भीतीच राहीली नाही , कठोर कारवाई करायला हवी ज्यामुळे त्यांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल व अशी क्रूत्य करायला धजावणार नाहीत , नाहीतर प्रकार घडत राहतील व ह्याच लोण पसरत राहील ,
आज जाळलेल्या गाड्यांचा आरोपी सुध्दा नौपाडा पोलीसांनी 8 तासात पकडला आहे ,गौरव पालवी ह्या 21 वर्ष युवकाने शुल्लक कारणावरून ईशा पॉवर लॉन्ड्रीचे मालक प्रशांत भोईर याची मोटार सायकल जाळली , त्याच्या भड्क्याने बाजूच्या 11 गाड्या पूर्ण जळाल्या आणि पाच गाड्या किरकोळ जळाल्या , गौरव याने किरकोळ भांडनातुन हे काम केलेल असले तरी त्याचा नाहक भुर्दंड इतरांना पडला आहे , पोलीसांनी या आरोपीवर 436,308 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे , आरोपी गौरव पालवी याच्यावर या पूर्वी एक गुन्हा दाखल झाला आहे , त्याने जेव्हा गाडी जाळली त्या वेळेला आजूबाजूच्या लोकांचे सुद्धा नुकसान होणार आहे याची माहीती असताना सुध्दा त्याने जाणूनबुजून आग लावल्या मुळे त्याच्यावर 308 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ,पोलीस उपायुक्त डॉ स्वामी यांनी हा प्रकार होऊ नये म्हणुन लोकांना स्वतः चा , सहाय्यक पोलिसांचा व इतर पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर देऊन नागरिकांना विश्वस्त केले आहे व कुठल्याही प्रकारची संशयास्पद घटना आढळली तर पोलिसांना त्वरित संपर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत .