डोंबिवली ( शंकर जाधव) कल्याण – डोंबिवली महानगर पालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती, दिव्यांग कल्याण, नागरी दलितवस्ती, झोपडपट्टी सुधारणा समितीच्यावतीने डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथे तीन दिवसीय महिला बचट गट मेळावा आयोजित करण्यात आला आहे.पालिका स्थापनेपासून प्रथमच जिल्हास्तरीय महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्याला मिळत असलेला उत्फुर्त प्रतिसाद पाहुन पुढील वर्षी राज्यस्तरीय महिला बचत गट मेळावा भरविण्याचा मानस उपायुक्त मिलिंद दहार यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महिला बाल- कल्याण समिती सभापती दीपाली पाटील,नगरसेविका सायली विचारे, माजी नगरसेविका वैशाली दरेकर- राणे,माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील, शिवसेना पदाधिकारी स्वप्नील पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी सभापती दीपाली पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या, या महिला बचत गट मेळाव्यात जास्तीत जास्त महिला बचत गटांनी सहभाग घेतला पाहिजे,जेणेकरून अश्या बचत गटांमुळे महिलांचे सक्षमीकरणं होईल.या मेळाव्यात महिला बचत गटांना मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले आहे.या मेळाव्यात कायदेशीर सल्ला, विविध विषयांवर मार्गदर्शन दिले जाईल. पुढे उपायुक्त दहार यांनी या मेळाव्यात महिला बचत गटांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.१७५ महिला बचत गट या मेळाव्यात सहभागी झाले आहेत. यानंतर कापडी आणि कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण आणि अनेक उपक्रमाद्वारे महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यास मदत करणाऱ्या श्वाती मोहिते यांनी स्थापन केलेल्या सक्षम नारी महिला बचत गट स्टॉलला सभापती दीपाली पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी भेट दिली. दरम्यान, गेल्या वर्षी कल्याण येथे महिला बचत गट मेळाव्याचे स्वरूप लहान होते. यंदाच्या मेळाव्यासाठी महिला व बाल कल्याण विभागासाठी सन २०१९ ते २०२० च्या अर्थसंकल्पात अंदाजित ३५ लाखाची तरतूद पालिकेतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी दिली.
विद्यमान सभापती दीपाली पाटील यांनी महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले. बालवाडी शिक्षिकांंसाठी बालसंस्कार प्रशिक्षण शिबीर, बालवाडी विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक खेळणी वाटप,महिलांसाठी कायदेशीर डीटीपी प्रशिक्षण,महिला व मुलींसाठी टॅॅल्ली प्रशिक्षण,जिल्हास्तरीयमहिला खो- खो स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यासाठी बालनाट्य स्पर्धा, उन्हाळी प्रशिक्षण मेळावा, महिला बचतगटांना प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान, दिव्यांग क्रीडा स्पर्धा व दिव्यांग मेळावा,दिव्यांगासाठी सार्वजनिक ठिकाणी व्हीलचेअर व रॅॅम्प बसवणे, दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना इत्यादी कामांबाबत दिपाली पाटील यांना सभापती म्हणून पुन्हा संधी द्यावी अशी चर्चा सुरू झाली आहे.