डोंबिवली :- ( शंकर जाधव ) माथाडी कामगारांचे नेते गुलाबराव जगताप यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमाला डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे गुरुवारी डोंबिवलीत येणार आहेत. या नेतेमंडळीच्याउपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. या प्रसंगी जगताप यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे. एक तपाहुन अधिक काळानंतर अजित पवार, जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डोंबिवलीत जाहीर कार्यक्रमाला येत आहेत. डोंबिवली पश्चिमेला असलेल्या भागशाळा मैदानात २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सदर सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.
२७ डिसेंबरला अजित पवार डोंबिवलीत
December 25, 2018
122 Views
1 Min Read

-
Share This!
You may also like
Aapale Shahar
-
Share This!