उल्हासनगर : उल्हासनगर परिमंडळातील अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर हद्दीत घरफोडी चोरीचे प्रकार वाढीस लागले होते. त्यानुषंगाने घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हेस शाखा युनिट ४ कडून चालू असताना पोलीस हवालदार सुनिल जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजी विमको नाका अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी सापळा लावला असता महिला नामे शिरीन नूरअली शेख वय ३३ वर्षे रा. बुवापाडा अंबरनाथ हिस ताब्यात घेऊन तपास केला असता फिर्यादी यांचे कोहोजगाव अंबरनाथ येथील राहते घराचे दरवाजाची कडी लोखंडी कटावणीने तोडून त्यांचे घरातील सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १,५६,००० रुपये किंमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची तिने कबुली दिली. सादर महिला आरोपी हि बुरखा घालून कपडे शिवण्याचा बहाना करून इमारतींमध्ये प्रवेश करीत व इमारतीतील बंद असलेले घर हेरून कटावणीच्या साहाय्याने घरफोडी करीत असे. ती महिला असल्याने तिच्यावर कोणी संशय घेत नसे व तिची कोणतीही तपासणी देखील इमारतीत प्रवेश करताना होत नसे हि महिला दुपारी १२ ते ३ दरम्यान बंद घरामध्ये घरफोडी करीत असे. तिच्याकडे अधिक तपास केला असता तिने अंबरनाथ पश्चिमेकडील सदर घरफोडीसह आणखी २ ठिकाणी घरफोडी केले असून एकूण ३ घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. तिच्याकडून घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील सर्वांच्या सर्व ११,४९,२१० रुपये किमतीचे सोन्याचे ३८ तोळे व ५८ ग्रॅम ४२० मि.ग्रॅम चांदीचे दागिने, घड्याळे, बॅग अशा वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरची कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस सहआयुक्त मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त गुन्हे दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे बाजीराव भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर गुन्हे शाखेचे वपोनी महेश तरडे, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सपोनि युवराज सालगुडे, सपोनीरी श्रीकुष्ण नवले, पोउनि गणेश तोरगल, सपोउपनि सुरेंद्र पवार, पोहवा किशोर महाशब्दे, प्रशांत तावडे, भात नवले, सुनील जाधव, रामचंद्र जाधव, गुरुनाथ जंगम व मपोह मनीषा मोरे, पोना विकास कर्णे, जगदीश कुलकर्णी, नवनाथ वाघमारे, जावेद मुलाणी, विठ्ठल पदमेरे, बाबुलाल जाधव, पोशी योगेश पारधी व मपोशी माया तायडे यांनी केली आहे.
घरफोडी चोरी करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश करण्यास उल्हासनगर गुन्हे शाखेस यश
December 27, 2018
50 Views
2 Min Read

-
Share This!