मुंबई

चेंबूरमधील टिळकनगरमधील इमारतीच्या ११ व्या मजल्यावरिल आगीत ४ जणांचा म्रूत्यू

मुंबई :  (संतोष पडवळ) चेम्बुर जवळील टिळकनगर परिसरात एका निवासी इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आज संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सध्या या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

टिळकनगर परिसरातील सरगम सोसायटीच्या ३५ व्या क्रमांकाच्या इमारतीच्या ११व्या मजल्यावर संध्याकाळी ७.५०च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुनीता जोशी (वय ७२), भालचंद्र जोशी (वय ७२) आणि सुमन श्रीनिवास जोशी ( वय ८३) यांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. तर आगीबरोबरच धुराचे लोट पसरल्याने श्रीनिवास जोशी (वय ८६) हे गुदमरल्याने त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.ही इमारत तळमजला अधिक पंधरा मजल्यांची आहे. रात्रीच्या वेळ असल्याने अनेक रहिवासी घरातच होते. आग लागताच अनेकांनी जीव मुठीत घेऊन घरातून पळ काढला. मात्र बुजुर्गांना आणि महिलांना घरातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेकजण या आगीत अडकले. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस, रुग्णवाहिका आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ बचाव कार्य सुरू करत इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्याने वाऱ्यामुळे ही आग आणखीनच भडकत होती. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत होत्या. त्यातच इमारतीत दोन स्फोट झाल्याने ही आग आणखीनच भडकल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकष्ठा करत तब्बल दोन तासांच्या प्रयत्नाने ही आग नियंत्रणात आणली. या आगीत जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. इमारतीतील अनेक घरांचा कोळसा झाल्याने या इमारतीतील रहिवाश्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. दरम्यान, आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!