दिवा (आरती मूळीक-परब)- सरत्या वर्षाच्या शेवटच्या पंधरवड्यात मुंबई सह ठाणे उनगरातील अनेक शहरात महोत्सवांचे आयोजने केली जातात. शहरातील सर्व जाती, धर्माच्या, पंथाच्या नागरिकांच्या सांस्कृतील, रूढी, परंपरांची जपणूक करण्यासाठी तसेच शैक्षणिक, कला, क्रिडा क्षेत्राला आणि स्थानिक नागरिकांना उद्योग, व्यवसायाची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अश्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. गेली एक तपा पासून आयोजित केल्या जाणाऱ्या दिवा महोत्सवाने अल्पावधीत शहरातील नागरिकांची मने जिंकली असून मंगळवार पासून सुरु झालेल्या दिवा महोत्सवाला उत्सवाचे स्वरूप आले आहे. महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केले जाणार असल्याने दिवा महोत्सव नागरिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

दिवा शहर शिवसेना व धर्मवीर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाच्या संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे या उद्देशाने दिवा महोत्सव या भव्यत्तम सोहळ्याचे आयोजन दि. 25 ते 30 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले असून या महोत्सवाचे उदघाटन कल्याण- डोबिवली महापालिकेच्या महापौर सौ. विनिताताई राणे यांचे हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व ठाणे महापालिकेच्या महापौर सौ. मिनाक्षीताई शिंदे, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे हे उपस्थितीत राहणार आहे, अशी माहिती संयोजक व उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिली.

दिवा विभागामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवा महोत्सावाचे आयोजन करण्यात आले असून याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे हे महोत्सवाचे 12 वे वर्ष आहे. दिवा विभागामध्ये संपन्न होणाऱ्या या महोत्सावामध्ये समाजातील संस्कृतीचे, प्रगतीशील वाटचालीचे तसेच वैशिष्टपूर्ण परंपरा व आगळेवेगळे चित्र साकारले जाणार असून दररोज समाजातील बंधु- भगिनीच्या कलाविष्काराने नटलेले बहारदार कार्यक्रमांसह कला, क्रिडा, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह भजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दिवा शहरातील आंतरशालेय विद्यार्थ्याकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे देखिल आयोजन या सोहळ्यात करण्यात आले आहे. या सोहळ्यात दरवर्षीप्रमाणेच विविध कार्यक्रमांची रेलचेल असून यामध्ये जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, दिवा भुषण, दिवा गुणीजन, दिवा गौरव, दिवा मॅरेथॉन पारितोषिक असे पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. याशिवाय महिलांना पैठणी भेट, खवय्येंसाठी विविध प्रकारचे पारंपारिक खाद्य स्टॉल, सुकी मच्छी बाजार, तसेच मुलांना खेळण्यासाठी आकाश पाळणे, विविध खेळणीसह मनोरंजक बाबी व आकर्षक खरेदीची संधी अशा विविध बाबींचा समावेश या महोत्सवात असल्याने पुढील पाच दिवसांमध्ये दिवा विभागातील नागरिकांसाठी कार्यक्रमांची व खादय पदार्थाची पर्वणीच दिवावासीयांना मिळणार आहे.

या महोत्सावाला ठाणेकर नागरिकांनी आवर्जुन भेट दयावी व दिवा महोत्सव कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन दिवा महोत्सवाचे संयोजक व उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केले आहे.
रमाकांत मढवी, उपमहापौर, ठाणे महापालिका – दिवा हा ग्रामीण भाग आहे. येथे मनोरंजनाचा कोणतेही साधन नव्हते. दिव्यातील तरुणांना, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे व्यासपीठ नव्हते. या दिवा महोत्सवाच्या माध्यमातून हे व्यासपीठ त्यांना तयार करुन दिले. दिव्याची संस्कृती, दिव्यात राहणारे सर्वधर्मीय व परप्रांतात राहणाऱ्या लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा महोत्सव सुरु झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तर आदर्श शिक्षक, दिवा भूषण, दिवा गुणीजण, दिवा गौरव असे पुरस्कार या महोत्सवात दिले जातात.
उदय पाटील, स्थानिक – या महोत्सवाची आम्ही तरुणाई आतुरतेने वाट पाहात असतो. या महोत्सवासाठी अगदी बदलापूर, विठ्ठलवाडी वरुन तरुणाई महोत्सवासाठी येतात. येथे तरुणांसाठी सांस्कृतीत कार्यक्रम, तर लहान मुलांसाठी पाळणे, खेळणी, खाऊ व कोकणातील विवध वस्तूंचे स्टॉल हा महोत्सवात असतात.