मुंबई, दि. 27 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेखचे सह्याद्री अतिथीगृह येथे अभिनंदन करून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, पर्यटनमंत्री जयकुमार रावल,पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर,रफिक यांचे वडील आदम शेख, भाऊ लखन शेख, प्रशिक्षक गणेश घुले यांच्यासह मान्यवर पैलवान उपस्थित होते.
रफिक शेख हे मूळचे खडकी (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील असून त्यांनी बुलढाण्याकडून खेळताना पहिल्यांदा विदर्भाला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रफिक यांना धन्यवाद दिले.