डोंबिवली ( शंकर जाधव ) पालिकेने प्रथमच महिला बचत गटांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला होता. मात्र नियोजन व्यवस्थित न नसल्याने आणि जाहिरात केली नसल्याने महिला बचत गटाच्या स्टॉलला ग्राहकांनी पाठ दाखविल्याने संतप्त महिलांनी कार्यक्रमात आलेल्या महापौर विनिता राणे यांना घेराव घातला. मात्र पालिका कमी पडली असली तरी महिला बचत गटासाठी शिवसेना पुढाकार घेईल असे सांगून यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे सारवा-सारव केली. मात्र सभापतीपद शिवसेनेकडे असताना या मेळाव्याला प्रतिसाद कमी पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मेळाव्याची प्रसिद्धी नीट केली नसल्याने ग्राहकवर्गाने प्रतिसाद न दिल्या बाबत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागले.यामुळे महिला बचत गटांनी महापौरांना घेराव घालत आर्थिक नुकसानीच्या भरपाईसाठी मागणी केली.कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील आणि ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटांना केंद्र व राज्य सरकारतर्फे दिल्या जाणा-या विविध योजनांची माहिती व्हावी, महिला विषयक कायद्यांचे मार्गदर्शन तसेच महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरिय महिला बचत गटांचा महामेळावा डोंबिवलीवपूर्वे कडील ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलनाच्या भव्य मैदानात २३ डिसेंबर ते २५ डिसेंबर या दिवसाच्या कालावधीत दुपारी चार ते रात्री १० वाजे पर्यंत बचत मेळाव्याचे आयोजन केले होते.या बचत मेळाव्यासाठी विविध कार्यक्रम व महिलांच्या बचत गटाना रोजगारा उपलब्ध करून देण्यासाठी विना शुल्क दोनशे हुन अधिक स्टॉल उपलब्ध करून दिले होते या मेळाव्यासाठी प्रशासनाने ३५ लाखाच्या निधीची तरतूद केली होती . जिल्हास्तरीय मेळाव्याच्या आयोजनासाठी तीन वेळा तारखा बदलल्याने बचत गटानी या मेळाव्याला प्रतिसादच दिला नाही. पालिका प्रशासनाकडे दीडशे बचत गटांना आपली नाव नोंदणी केली होती. आकर्षित जिल्हास्तरीय बचत मेळाव्याला प्रशासनाच्या नियोजनाचा आभाव दिसून आला. या मेळाव्याला प्रसिद्धी न मिळाल्याने बचत गटाच्या स्टोल कडे ग्राहकांनी फिरविल्याने विविध वस्तूंच्या विक्रीसाठी आलेले बचतगट चिंताग्रत झाले होते. मेळाव्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत ग्राहक फिरकलेच नसल्याने मेळाव्यात सहभागी झालेल्या शेकडो महिला बचत घटना नुकसानीला सामोरे जावे लागले.या बचतगटाच्या महिलांनी विक्री साठी हजारो रुपयांचा आणलेला हजारो रुपयांचा माल विक्रीस गेला नाही तर खाद्य पदार्थ विक्रीचे स्टोल लावलेल्या महिला बचत गटांना त्यानीं विक्री साठी ठेवलेले खादय पदार्थाचे नाशवंत असल्याने दरदिवशी फेकून देण्याची वेळ आली होती .या तीन दिवशी मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर माल विक्रीस गेला नाल्याने आर्थिक नुकसान बरोबर वेळेचा अपव्यय झाल्याने बचत गटातील महिलांनी नाराजगी व्यक्त केली .या समारोपाच्या दिवशी या मेळाव्याला पालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी भेट दिली असता त्यांनाही प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार दिसून आला .
बचत गटाला ग्राहकांनी पाठ फिरविल्याने बचत गटाच्या महिलांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानी सामोरे जावे लागल्याने मेळाव्यातील बचत गटाच्या महिलांनी महापौर विनिता राणे यांना घेरावा घालीत या मेळाव्याची प्रसिद्धी नीट केली नसल्याने ग्राहकवर्गाने प्रतिसाद न दिल्या बाबत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे बाबत आपली व्यथा मांडीत आर्थिक नुकसानीच्या भरपाईसाठी मागणी केली .अखेरीस महापौरांनी बचत गटाच्या महिलांची समजूत घालून मेळाव्यातील नियोजनाच्या त्रुटी ऐकून घेतल्या व पुढच्या वेळी नियोजन बद्ध मेळावा आयोजित करण्याचे आश्वासन दिले मात्र प्रशासनाच्या नियोजनाचा अभावी महिला बचत गटा च्या मेळाव्याला ग्राहकांनी पाठ फिरविल्याने जिल्हास्तरीय बचत गट मेळाव्याचा फज्जा उडाला होता .या बाबत पालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीचे उपायुक्त मिलिंद धाट यांच्याशी संपर्क साधला असता या मेळाव्याच्या माहितीसाठी प्रशासनाने शहरातील मोक्याच्या ठिकाणी बेनर ,होडींग,तसेच वृत्तपत्र व टीव्ही वर जाहिरातबाजी केली असल्याने या मेळाव्याच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यात कुठेही कमी पडलेलो नसल्याची माहिती दिली. सदरच्या मेळाव्याच्या कार्यक्रमाची तीन वेळा तारीख बदलल्याने त्याचा परिणाम बचत गटांवर झाला हे मान्य केले बचत गटांना मोफत पालिकेने स्टोल उपलब्ध करून देत बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याचे ही त्यांनी सांगितले
पालिका प्रशासन मेळाव्याची प्रसिद्धी करण्यास कमी पडल्याने याचा फटका महिला बचत गटांना पडला आहे.पालिका प्रशासनाला नियोजन करणे जमत नव्हते तर प्रशासनाने हे काम महिला बचत गटांना दिले पाहिजे होते.यामुळे झालेले नुकसान पालिका प्रशासनाने भरून दिले पाहिजे असे सक्षम नारी महिला बचत गटांच्या स्वाती मोहिते यांनी सांगितले.