डोंबिवली– ( शंकर जाधव) शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि कार्यक्रमाला वेळेवर पोहोचता यावे म्हणून राष्ट्रवादी नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पावर यांना लोकल मधून प्रवास करून डोंबिवली यावे लागले.यापूर्वी कै.माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनीही १० वर्षांपूर्वी डोंबिवलीतुन मुंबईला लोकलने जाणे पसंत केले होते.
डोंबिवलीत एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आले.मात्र डोंबिवलीत येताना पवार यांनी मुंबईतुन लोकलने प्रवास केला.त्यांच्याबरोबर प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील, गणेश नाईक, महेश तपासे यांच्यासह अनेक नेत्यांनीही लोकल प्रवास केला.