डोंबिवली :– ( शंकर जाधव )थर्टी फर्स्टच्या रात्री मित्रांच्या सोबतीने मद्याचा एक एक पेग रिचवत धिंगाणा घालणाऱ्या तळीरामानी व वर्षाच्या आनंदाच्या रंगाच्या बेरंग केला तर त्यांना खाकी वर्दीचा इंगा महागात पडणार आहे .कल्याण परिमंडळ-३ने तळीरामना वठणीवर आणण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली असून पोलिसांचा ताफा रस्त्यावर तैनात राहणार असून नाकाबंदी ,पेट्रोलिंग करून अनुचित प्रक्रार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टचा आनंद नक्की घ्या मात्र या आनंदात विरजण पडेल असे कोणते हि वर्तन करू नका असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई एकवटली असून आधी पासूनच थर्टी फर्स्ट च्या पार्टीचे नियोजन सुरु केले आहे.या मद्ये जास्तीत जास्त वर क्लब व पब मध्ये जावून थर्टी फर्स्टचा आनंद साजरा करतात .दारूच्या नशेची झिंग चढल्यानंतर वेगाने गाड्या चालवणे ,वादावाद करणे,छेदछाड असे काही अनुचित प्रकार घडत असतात.या घटनेमुळे या सेलिब्रेशनच बेरंग होतो. त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून शहरातील आस्थापनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ब्रेथएनलायझर मशीनच्या आधारे नशेत झिंगत गाड्या चालवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या मद्यपी वर नजर ठेवन्यात येणार आहे.या साठी १ डीसीपी,२ एसीपी ,१६ पीआय ,६४ एपीआय ,पीएसआय,५८७ कर्मचारी ६४ महिला कर्मचारी ताफा तैनात करन्यात आला आहे .शहरातील चौकात नाक्यावर नाकाबंदी ,पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.