ठाणे दि ३१: ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातील दूरमुद्रणचालक-टंकलेखक अर्चना देशपांडे यांना आज त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी कोकण विभागाचे उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनी पुष्प गुच्छ व भेट वस्तू देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली.
याप्रसंगी पत्रकार, संपादक, अर्चन देशपांडे यांचे पती अजितकुमार, कुटुंबातील सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
अर्चना देशपांडे यांनी मंत्रालय, कोकण भवन आणि ठाणे जिल्हा माहिती कार्यालय याठिकाणी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या, त्यांनी ३८ वर्षे सेवा केली. विशेषत: पत्रकारांसाठी अधिस्वीकृती, जाहिरात या विषयावर त्यांचा हातखंडा होता.
याप्रसंगी बोलताना उपसंचालक डॉ गणेश मुळे म्हणाले की, अर्चना देशपांडे यांच्या अनुभवाचा फायदा संपूर्ण कोकण विभागाला मिळाला. नियम आणि शिस्तबद्धतेने काम ही त्यांची ओळख आहे. यावेळी मंत्रालयातील वरिष्ठ सहायक संचालक डॉ संभाजी खराट, ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन, संजय पितळे, दिलीप शिंदे, चंद्रकांत भोईटे, गणेश भोईटे यांनीही आपली मनोगते व्यक्त करून अर्चना देशपांडे यांच्या कामाबद्ध प्रशंसोद्गार काढले. शेवटी जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी आभार मानले.