डोंबिवली : ( शंकर जाधव ) महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ (पुणे) आयोजित ४० वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद २९ व ३० डिसेंबर रोजी चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सांस्कृतिक येथे महाराष्ट्रातील असंख्य कलाध्यापकांच्या उपस्थितीत संपन्न झाली या परिषदेत स्वागताध्यक्ष सुधीर मुनगंटीवार वित्त आणि नियोजन व वने मंत्री यांचे उपस्थित कलाशिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच आतंरराष्ट्रीय चित्रकार श्री. प्रफुल सावंत नाशिक यांनी जलरंगात अतिशय सुंदर असे निसर्ग चित्रांचे प्रात्यक्षिक सादर केले या परिषदेत ठाणे जिल्ह्यातील के. सी. गांधी स्कूल कल्याणचे कलाशिक्षक अमोल बी. पाटील यांना शैक्षणिक, सामाजिक, संघटनात्मक व कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार शिक्षण उपसंचालक (नागपूर) निलेश पाटील यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. ही परिषद शिक्षणाधिकारी माध्यमिक (चंद्रपूर) संजयजी डोरलीकर, तसेच कलाध्यापक संघ महामंडळाचे पी. आर. पाटील, विलास सेसाने, सुधाकर बोरसे व असंख्य कलाशिक्षकांच्या उपसस्थित संपन्न झाली