अंबरनाथ दि. ०१ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
दरवर्षीप्रमाणे यंदाही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था अंबरनाथ (रजि.) आयोजित शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मरणार्थ “आगळीवेगळी भाऊबीज”च्या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पश्चिमेकडील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन शहिद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्यजित नरेश गायकवाड व सभाध्यक्ष कबीर नरेश गायकवाड यांनी केले होते. दरम्यान ५ हजारांहून अधिक महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार विद्याताई चव्हाण, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुधा नरेश गायकवाड, समाजसेविका मंदा गायकवाड, नगररचना विभागाच्या सभापती वृषाली पाटील, समाजसेविका कल्पना गायकवाड, माजी नगरसेविका मंगल खराडे आदींच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) चे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड, सेवानिवृत्त शंकर गायकवाड, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, माजी नगराध्यक्ष जयसिंग पाटील, अंबरनाथ मुस्लिम जमातीचे अध्यक्ष शौकतअली शेख, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल, अंबरनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांसह सर्वांचे स्वागत स्वागताध्यक्ष माजी नगरसेवक पांडुरंग खराडे, ऍड. परितोष श्याम गायकवाड, शिक्षण मंडळ माजी सदस्य वसंत जाधव आदींनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शकांनी मोलाचे मार्गदर्शन केले
अंबरनाथ शहरातील पिण्याच्या प्रश्न हा खूपच गंभीर होत चाललेला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नियोजन हे चुकीच्या पद्धतीने असल्याने त्यांचा भुर्दंड हा शहरातील नागरिकांना होत आहे. त्याकरिता शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाण्याकरिता लवकरच भव्य असे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सत्यजित नरेश गायकवाड व कबीर नरेश गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
भारतीय बौद्ध महासभेचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रभाकर सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.