डोंबिवली :- ( शंकर जाधव ) ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अशा वाहन चालकांमध्ये भर पडते. त्यामुळे पोलिसांनी गंभीर दखल घेत ३१ डिसेंबर रोजी तब्बल ३३३ मद्यपी वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करत दणका दिला तसेच दिवसभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३१३ वाहनचलकांवर दंडात्मक कारवाई केली.
२५ डिसेंबरपासून सर्वत्र नाताळ फिव्हर सुरू होता त्यातून थर्टी फर्स्ट च्या दिवशी तर तळीरामांच्या जणू अंगात संचारले होते. नववर्षाच्या रंगाचा वेरंग होऊ नये म्हणून तळीरामाना पोलिसांनी कायदा सुव्यवस्था ठेवण्याचे आवाहन केले होते.मात्र तळीरामांनी या आवाहनाला प्रतिसाद न देता आपला धुमाकूळ सुरूच ठेवला होता शहरात उत्साहाचे वातावर असल्याने त्यात तळीरामांचे विघ्न येऊ नये म्हणून वाहतूक पोलीस इन ऍक्शन होत वादविवाद, अपघाताच्या घटना घडू नयेत यासाठी तळीरामांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती.विशेष पथकांनी नाकाबंदी करून तळीरामांची धुंद उतरवली.कल्याण वाहतूक पोलीस व शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली.यात कल्याण पश्चिम १२९,कल्याण पूर्व ९४, डोंबिवली ११० अशा मिळून एकूण ३३३ तळीरामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर भरधाव वाहतूक,ट्रिपल सीट ,विना परवाना ,काळयाकाचा आदी कल्याण पश्चिम १५० ,कल्याण पूर्व १०० ,डोंबिवली ६३ असा मिळून एकूण ३१३ वाहनचालकांना कारवाई चा बडगा उगारला.