ठाणे

डोंबिवलीतील टिळकनगर प्रभागातील अंतर्गत रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे फलक …. भाजप-मनसेचा आक्षेप

डोंबिवली : ( शंकर जाधव ) डोंबिवली वाहतूक पोलिसांनी पूर्वेकडील टिळकनगर प्रभागातील अंतर्गत रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे फलक लावण्यात आले.आधीच अरुंद रस्ता त्यात अश्या प्रकारच्या फलकांमुळे नागरिकांनी भाजप आणि मनसेकडे धाव घेतली. नागरिकांच्या तक्रारीवर लक्ष देत भाजप नगरसेवक आणि मनसेचे माजी नगरसेविकाने डोंबिवली शहर उपशाखा वपोनी नारायण जाधव यांना जाब विचारला.डोंबिवली शहर वाहतूक पोलीस विभागाने टोईग वाहन करणार्या ठेकेदारालाच हे ७०० फलक लावण्याचे कंत्राट दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

डोंबिवलीतील वाहतूकीची कोंडी कमी करण्यासाठी शहर वाहतूक विभाग कामाला लागल्याचे दिसत असून डोंबिवलीत वाहतूक नियंत्रण शाखा ठाणे शहर यांनी सुमारे ७०० सम-विषम पार्किंगचे फलक लागू लागले आहेत.हे फलक लावताना जेथे गरज नाही अशा गल्लीबोळात सम-विषम फलक लागल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. टिळकनगर प्रभागातील शाळेजवळ  नो पार्किंगचा फलक लावण्यापेक्षा तेथे पी-२ असा फलक लावण्यात आला आहे. वास्तविक शाळेच्या परिसरात नो पार्किंगचा फलक लावणे गरजेचे आहे. मात्र कसे तरी फलक लावण्याचे काम संपवण्याच्या नादात अशी कामे होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नो पार्किंगचे फलक वास्तविक मुख्य रस्ते,चौक येथे तातडीने लागणे आवश्यक असताना गल्लीबोळात हे फलक का लावले  असा प्रश्नही नागरिकांनी पडला आहे.स्थानिक भाजप नगरसेवक राजन आभाळे यांना विचारले असता ते म्हणाले, नागरिकांना विश्वासात न घेता वाहतूक पोलिसांनी लावलेले सम-विषम पार्किंगचे फलक लावले आहेत. अंतर्गत रस्त्यावर हे फलक लावले असल्याने टोविंग व्हॅन येणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ शकते.म्हणून वाहतूक पोलीस या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी करत आहेत का वाढवीत आहे असा प्रश्न पडतो.तर मनसेचे माजी नगरसेवक मनोज राजे,मनविसे शहर संघटक मिहीर दवते ,शाखा अध्यक्ष निखिल साबळे, माजी शाखा अध्यक्ष सूर्यकांत पारधे, मनविसे शाखा अध्यक्ष प्रथमेश जोगळेकर यांनी वपोनी जाधव यांना यासंदर्भात निवेदन देऊन लवकरात येथील फलक काढून टाकण्यात यावे अशी विनंती केली.

टिळकनगर प्रभागातील अंतर्गत रस्त्यावर सम-विषम पार्किंग फलक लावण्यात आले आहे. नागरिकाच्या सुचनाचा आदर आणि भाजप –मनसेचे केलेली विनंती यावर नक्कीच विचार करू. नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

                                   -वाहतूक पोलीस निरीक्षक जाधव

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!