डोंबिवली : ( शंकर जाधव ) जनरल एज्युकेशन इन्स्टिटय़ूट, दादर मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग व कल्याण डोंबिवली महानगरपालिका वतीने ५ व ६ जानेवारी रोजी दरम्यान डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्यासंकुल येथे विज्ञान संमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे..या निमित्ताने गुरुवार दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजी विज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.ही दिंडी सकाळी ७ वाजता ब्लाॅझम स्कूल (स. वा. जोशी विद्यासंकुल) येथून सुरू होऊन ८.३० वाजता स. वा. जोशी विद्यालय येथे संपन्न झाली. योग – आयुर्वेद – निसर्गोपचार – पर्यावरण – जीवनशैली हा या विज्ञान सम्मेलनाचा केंद्रबिंदू असल्याने सदर विज्ञान दिंडीत अनेक शाळेतील विद्यार्थी, विज्ञान – फ्लोट, आयोजक मान्यवर, योग विद्या धाम डोंबिवली – फ्लोट विज्ञान पालखीसह सहभागी झाले होते. योग विद्या धाम डोंबिवली संस्थेचे अध्यक्ष नाना कुटे, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष सौ छाया थत्ते, कार्यवाह सुहास बडंबे, कोषाध्यक्ष सौ उर्मिला पाटील, प्रसिध्दी प्रमुख व्यंकटेश टी आर व इतर पदाधिकारी, शिक्षक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. योग विद्या धाम डोंबिवली संस्थेच्या योग शिक्षकांनी चालत्या फ्लोटवर योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगविषयक फलक हातात घेतले होते. योग विद्या धाम डोंबिवली संस्थेने डोंबिवली व कल्याण शहरात आज दिनांक ३ जानेवारी पासून ते ३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत एक महिना कालावधीत जवळ जवळ १०० पेक्षा जास्त विनामूल्य योग प्रवेश वर्ग सुरू केले असून सर्व वर्गांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे . तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी या विनामूल्य योग वर्गांचा फायदा घ्यावा व त्यासाठी अजून ४ ते ५ दिवस नागरिकांना वर्गास प्रवेश देण्यात येणार आहे असे योग विद्या धाम डोंबिवली संस्थेने जाहीर केले आहे.
डोंबिवलीत विज्ञानदिंडीत योग विद्या धाम संस्थेचा सहभाग
January 4, 2019
34 Views
2 Min Read

-
Share This!