ठाणे

वागळेतील रस्ता रूंदीकरण मोहिम धडाक्यात,२०० बांधकामे जमीनदोस्त

ठाणे  ( संतोष पडवळ) : रस्ता रूंदीकरण मोहिमेतंर्गत आज वागळे इस्टेटमध्ये सावरकर नगर ते ज्ञानेश्वरनगर या दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये जवळपास २०० पेक्षा जास्त बाधित व्यावसायिक बांधकामे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थीतीत जमीनदोस्त करण्यात आली. तथापि या रस्त्यात बाधित होणारी जवळपास १२५ निवासी बांधकामे पुनर्वसनानंतर निष्काषित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री. जयस्वाल यांनी या कारवाईच्यावेळी दिले.

महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार रस्ता रूंदीकरणाची मोहिम महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली असून शुक्रवारी वाघबीळ नाका ते वाघबीळ गाव या रस्त्यात बाधित होणारी जवळपास १२५ बांधकामे तोडून टाकण्यात आली होती.

आज वागळे इस्टेटमध्ये सावरकर नगर ते ज्ञानेश्वर नगर या रस्त्याच्या रूंदीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेतंर्गत मराठा हाॅटेल सर्कल, कामगार हाॅस्पीटल आणि परिसरातील जवळपास २०० पेक्षा जास्त व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

सद्यस्थितीत सावरकर नगर ते ज्ञानेश्वर नगर हा रस्त २५ मीटरचा असून आता या कारवाईमुळे हा रस्ता ३० मीटरचा होणार आहे.

सदरची कारवाई उपायुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले, नगर अभियंता राजन खांडपेकर, उपनगर अभियंता अर्जून अहिरे, सहाय्यक आयुक्त मारूती गायकवाड, झुंजार परदेशी, सचिन बोरसे, कार्यकारी अभियंता नितीन येसुगडे, दिपक घाडगे, रामदास शिंदे, किशोर गोळे यांनी पोलिस बंदोबस्तात केली.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

ठाणे

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरघर तिरंगा अभियान सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील आद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळांची दयनीय अवस्था ?जिल्हाधिकां-याचा सकारात्मक प्रतिसाद !

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!