ठाणे

अंबरनाथच्या प्रकाशनगर येथील विविध मागण्याकरिता अखिल भारतीय सेनेचा अंबरनाथ नगरपालिकेवर “विराट मोर्चा”

* शहरप्रमुख अशोक सिनिरप्पा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला मोर्चा
* नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर मोर्च्याची समाप्ती
अंबरनाथ दि. ११ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
          अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील वॉर्ड क्रमांक ५५ मधील प्रकाशनगर मध्ये पेव्हर ब्लॉकची व्यवस्था नाही, बसवलेले पेव्हर ब्लॉक दुय्यम दर्जाचे असून काही जागेवर ड्रेनेज लाईनची देखील व्यवस्था नाही अशा विविध मागण्याकरिता अखिल भारतीय सेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अशोक सिनिरप्पा यांच्या नेतृत्वाखाली “विराट मोर्चा” प्रकाशनगर येथून अंबरनाथ नगरपरिषदेवर काढण्यात आला होता. सदर मागण्या संदर्भात अखिल भारतीय सेनेच्या वतीने आमरण उपोषण करून व अनेक तक्रारी करून देखील कारवाई झाली नाही. म्हणून हा विराट मोर्चा काढण्यास भाग पडल्याचे अशोक सिनिरप्पा यांनी सांगितले.
           या मोर्च्यात ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत म्हात्रे, विधानसभा अध्यक्ष दीपक गाडे, उल्हासनगर शहरप्रमुख ज्ञानेश्वर करवंदे, युवा अध्यक्ष गणेश पवार,  कल्याण युवा अध्यक्ष संदीप चव्हाण, डोंबिवली शहरप्रमुख अनिरुद्ध गायकवाड, बदलापूर शहरप्रमुख ईश्वर गरुड, वार्ड अध्यक्ष रोहित गोरे, वॉर्ड क्रं. ५५ वॉर्ड अध्यक्षा कांचन खोब्रागडे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
           मोर्च्यातील शिष्टमंडळाने अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांची भेट घेतली असता, नगराध्यक्षांनी लवकरात लवकर आपल्या मागण्या लक्षात घेऊन सदर ठिकाणाची पाहणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी दिल्याचे अखिल भारतीय सेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अशोक सिनिरप्पा यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!