नवी मुंबई : (संतोष पडवळ)खारघरमध्ये सिडकोने उभारलेल्या स्वप्नपुर्ती रहिवासी संकुलनात अंतर्गत गाळे आणि स्टँल्सची नियमबाह्य बांधकाम केले आहे. या अंतर्गत गाळे व स्टाँलमुळे नागरिकात चिंतेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले असून महिला, मुले व वुध्दांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील रहिवासीनी सदनिका परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या संकुलनातील गाळे व स्टाँलची पाहणी करत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत यांनी येथील सदनिकाधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यसरकार तथा सिडकोच्या धोरणानुसार भव्य स्वरूपात स्वप्नपुर्ती रहिवासी संकुल निर्माण केले आहे. त्यामध्ये व्यवसायिक हेतू नियमानुसार असणे आवश्यक आहे. असे असताना येथे माया जमविण्याच्या उद्देशाने नियमबाह्य अंतर्गत गाळे व स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथील रहिवासीना राहणे मुश्किल होणार आहे. या अंतर्गत गाळे व स्टाँलच्या मुळे येथे रहिवासी व्यतिरिक्त बाहेरील लोकांचा राबता वाढणार आहे. परिणामी महिलांची छेडछाड, विनयभंग व तत्सम घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व चिंता महिला वर्गाला लागली आहे. या संकुलनात यापुर्वी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात अंतर्गत गाळे व स्टाँलच्या विक्री झालीच तर कुप्रवुत्तीच्या व्यक्तीना अधिक चालना मिळेल. या गाळ्यांची मालकी हक्क घेतल्याने कोणत्याही प्रकारचे धंदे करण्यास मोकळीक मिळेल यावर कोणतेही नियंत्रण असणार नाही तेव्हा अंतर्गत गाळे व स्टाँल बंद करून त्या जागेवर रहिवासी संकुल उभे करण्यात यावेत अशी विनंती स्वप्नपुर्ती रहिवासीनी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत यांच्याकडे केली आहे.
या स्वप्नपुर्ती संकुलनाची पाहणी वासूदेव घरत यानी रहिवासी सोबत करून सिडकोचे अध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकुर यांंना साकडे घालून या संकुलनातील अंतर्गत गाळे व स्टाँल बंद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. या संकुलनातील गाळे व स्टाँल बंद करण्यात आले नाही तर रहिवासीनी घरे विकण्याची निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेण्याची कोणतीही गरज पडणार नसल्याचे वासुदेव घरत यांनी उपस्थित रहिवासीना सांगितले जुलै २०१८ रोजी हे गाळे व स्टाँल बंद करण्यासाठी सिडको प्रशासनाला लेखी निवेदनाने विनंती केली
आहे त्याकडे सिडकोने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याने महिला वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे