ठाणे

*आगरी – कोळी महोत्सवाचा ९ दिवस दिमाखदार सोहळा संपन्न..*!

*#आगरी-कोळी महोत्सवाने महाराष्ट्राच्या संस्कृतिची परंपरा राखली..*!

*# राज्य स्तरीय “आधार इंडिया ” पुरस्काराने सन्मानीत झाले, शेकडो कलाकार,समाज सेवक आणि राजकारणी..*!

*# शिवसेना जेष्ठ नेते अनंत तरे यांची सदिच्छा भेट…*

*@ सुभाष पटनाईक यांचे विशेष वृत्त….*

*कल्याण -* महाराष्ट्राच्या संस्कृतिची जाण करुन देणारे खरे वैभव डोंबिवली शहरात लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. अशा अदभुत व भव्य-दिव्य आगरी-कोळी महोत्सवाची अखेर सांगता मधुर सुरांच्या मैफिलित करण्यात आली. डोंबिवली येथील हभप.सांवळाराम क्रीड़ा संकुलाच्या मैदानात गेली ९ दिवस चालणारा दिमाखदार आगरी-कोळी महोत्सवाचा सोहळा अखेर १३ जानेवारीच्या रात्रि संपन्न झाला.
आगरी कोळी महोत्सवाचे यंदाचे हे दूसरे पर्व होते.या दुसर्यावर्षीही हजारो रसिक-श्रोत्यांनी या सांस्कृतिक परंपरेची दखल घेवून चांगला प्रतिसाद दिला.
डोंबिवलीचे जेष्ठ समाज सेवक जयेंद्र धर्मा पाटील याचे धर्मराज फाउंडेशन ,कला ,क्रीड़ा,
शैक्षणिक क्षेत्रात सतत कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून साकार झालेले व त्यांच्या सहकार्यांनी घडवून आलेला असा हा आगळा-वेगळा आगरी-कोळी महोत्सव सोहळा, स्थानिक लोकांच्या हितासाठी सुरु करण्यात आला होता.
वेग-वेगळ्या प्रकारचे स्टॉलच्या माध्यमातुन अनेक दुर्मिळ वस्तु खरेदी करण्याची त्यांना संधिच मिळाली.
या मोहोत्सवात पंढरपुर येथील आळंदीच्या दिंडी सोहळ्याचे अद्द्भूत दर्शन घेण्याचे भक्तांना भाग्य प्राप्त झाले.
आगरी-कोळी सोहळ्यात मराष्ट्राच्या संस्कृतिची जाण ठेवून ,आयोजकांनी नृत्य,लावणी ,मधुर गीते, अंध व्यक्तीचा ओर्केस्टा, विविध नाट्य प्रयोग सांस्कृतिक कार्यकर्माची शोभा वाढवून , कार्यक्रम अखेर यशस्वी करुन दाखविले आहे.या आगरी-कोळी महोत्सव सोहळ्याला दिग्गज मंडळीनी आवर्जून उपस्थिति दाखविली होती.
दरम्यान आगरी- कोळी समारोपच्या पूर्व संध्येला राज्यस्तरीय “आधार इंडिया ” पुरस्काराने दिग्गज मराठी कलाकार,समाज सेवक,सामाजिक कार्यकर्ते,राजकारणी, स्थानिक पत्रकार सुभाष पटनाईक,शंकर जाधव,योगेश गोड़े, यांना प्रमाण पत्र आणि स्मृति चिन्ह देवून विशेष त्यांचे गौरव करण्यात आले.
आगरी-कोळी मोहोत्सवाच्या समारोप समारंभच्या ९ व्या दिवशी रात्रि उशिरा शिवसेनेचे जेष्ठ नेते अनंत तरे यांनी आवर्जून उपस्थिती दाखवून ,सदिच्छा भेट दिली.आगरी-कोळी समाजाच्या बांधवांना एकत्र येण्याचे जाहिर आवाहन करुन,आपल्या मार्गदर्शनातुन मोलाचा सल्ला दिला. आणि आगरी- कोळी हा समाज एकत्र होवून संघटीत झाल्यास मुंबई मंत्रालयातील सहावा माळ्यावर आपल्या समाजाचा माणुस नक्की विराजमान होणार ..! अशी आधीच भविष्य वाणी करुन ,आगरी-कोळी समाजच्या लोकांचे मन जिंकले. तसेच मंचावरुन मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच महिला बाल-कल्याण सभापति रेखा चौधरी यांचा विशेष स्मृति चिन्ह व श्री गणेशाची नावा स्वरूप प्रतिमा भेट देवून सन्मान करण्यात आला.
महाराष्टाचे लाड़के दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांचे पुत्र चंद्रकांत शिंदे यांनी आपल्या मधुर आवाजाने पंढरपुरच्या विठ्ठलाला जणू साक्षात प्रगट केल्याची रासिकांना त्यांची जाण करुन दिली.
सोहळ्याचे आयोजक व अध्यक्ष जयंत धर्मा पाटील, उपाध्यक्ष राजेन्द्र चौधरी, निवेदक विवेक पोरजी,कैलास पाटील, सागर पाटील, किरण पाटील, लालचंद पाटील,महेश संते,दत्ता पाटील, किशोर म्हात्रे,रविन्द्र पाटील, महेंद्र पाटील, गंगाराम मढवी ,अमित दुखंडे,महेंद्र धर्मा पाटील, सुनील पाटील या सर्व मित्र-मंडळीनी या सांस्कृतिक आगरी -कोळी महोत्सवासाठी विशेष परिश्रम घेवून हा मोहोत्सव यशस्वी केल्याचा सन्मान प्राप्त केला..

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!