* तालुका अध्यक्ष विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण
* विविध पक्षांनी दर्शविला पाठींबा
अंबरनाथ दि. १६ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
“महावितरणाच्या वाढीव लाईट बिलाच्या विरोधात” स्वाभिमान संघटना अंबरनाथ शहराचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष विकास हेमराज सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ पश्चिमेकडील महावितरण कार्यालयासमोर आजपासून “आमरण उपोषणास” बसलेले आहे. आजचा उपोषणाचा पहिला दिवस असून या उपोषणाला विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठींबा दर्शविला आहे.
उपोषणाला स्वाभिमान संघटनेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष विकास हेमराज सोमेश्वर यांच्यासोबत अॅड. अमोल विनायक वझे, उल्हासनगर शहर अध्यक्ष विशाल सोनवणे, नवरेनगर विभाग संघटक लखन चव्हाण, लादीनाका विभाग संघटक गुरू चलवादी, भेंडीपाडा विभाग संघटक शंकर कोळी आदी पदाधिकारी उपोषणास बसले आहे. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, नगरसेवक उमेश अनंता पाटील, मिलिंद पाटील, पंकज पाटील, समाजसेवक राहुल सोमेश्वर आदींनी आपला पाठींबा दर्शवित महावितरणाच्या वाढीव लाईट बिलाचा विरोध केला.
अंबरनाथ हा ग्रामीण भागात असतानाही विद्युत युनिट शहरी भागाच्या तुलनेत अतिशय जास्त प्रमाणात आकारण्यात येते हा नागरिकांवर अन्याय आहे, २ वर्षांपूर्वीचे कमर्शियल व घरगूती वापरचा स्थिर आकार हा १० पटीने वाढविलेला आहे त्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे, मीटरचे फोटो व वीज बिल वाटपाचा ठेका ज्या ठेकेदाराला दिलेला आहे त्याच्याकडून वेळेवर बिल वाटप करण्यात येत नसून मुदतीच्या एक दिवस अगोदर बिले नागरिकांना वाटण्यात येतात, वाढीव बिलाबाबत अधिकाऱ्यांना नागरिक विचारणा करण्यास गेल्यास, त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा केली जाते, वीजबिल न भरल्यास महावितरणचे कर्मचारी कुठलीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करून मीटर काढून नेण्यात येते अशा विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू असल्याचं तालुका अध्यक्ष विकास सोमेश्वर यांनी सांगितले.
“महावितरणाच्या वाढीव लाईट बिलाच्या विरोधात” स्वाभिमान संघटनेचे आमरण उपोषण
