ठाणे

अंबरनाथच्या नगरपालिका शाळांमध्ये खुशी संस्थेच्या वतीने विविध विषयांवर भरविण्यात आले प्रदर्शन

* उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्याहस्ते उदघाटन
 
अंबरनाथ दि. १८ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
          खुशी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळा क्रं. ९ शिवमंदिर येथे १ ली ते ८ वी या वर्गासाठी विविध विषयांवर प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्याहस्ते करण्यात आले.
          याप्रसंगी अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार, नगरसेवक किरणकुमार कांगणे, शिक्षणाधिकारी गजानन मंदाडे, खुशी संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर उज्वला पटेल, मन्सूर पटेल, मिलिंद कडवे, संदीप बेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
          हसत खेळत विद्यार्थ्यांमध्ये  समाज निर्माण करत विद्यार्थ्यांच्या मनात असलेली इंग्रजीची भीती दूर करणे, भूगोल व खगोलाच्या घटना कृतीयुक्त पद्धतीने समजून घेणे, मुलींना शारीरिक मानसिक बद्दल समजावून लैगिक शोषणाविरुद्ध जागृत करणे, याचसोबत आर्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणास वाव देऊन प्रोत्साहन देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. पुढच्या वर्षी गांधी जन्मास १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गांधी जीवनाचा आढावा घेणाऱ्या प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.
          या प्रदर्शनाकरिता केंद्र समन्वयक शेषमल राठोड, शाळा क्रं. ९ च्या मुख्याध्यापिका रत्नप्रभा जाधव यांचे मोलाचे योगदान लाभले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!