डोंबिवली : क्रेडाई महाराष्ट्र चेम्बर ऑफ हौसिंग इंडस्ट्री कल्याण डोंबिवली युनिट तर्फे चे ८ वे एक्स्पो २४ ते २७ जानेवारी दरम्यान सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत कल्याण पश्चिमेकडील लालचौकी येथील फडके मैदानात आयोजित करण्यात आले आहे .या प्रदर्शनात कल्याण डोंबिवली ,अंबरनाथ ,बदलापूर ,टीटवाळा ,ठाणे परिसरातील सुमारे ५७ बांधकाम व्यावसायिक आपल्या सुमारे २०० प्रोजेक्ट सह सहभागी होणार असल्याची माहिती एम सी एच आय कल्याण डोंबिवली युनिट चे अध्यक्ष रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली .पुढे बोलताना पाटील यांनी कल्याण डोंबिवली मध्ये मेट्रो ट्रेन ,एम एम आर डी ए चे प्रकल्प ,स्मार्त सिटी योजना ,सिटी पार्क असा अनेक नागरिक हिताच्या योजना सुरु असून येत्या काळात कल्याण महत्वाच जंक्शन असल्याने या शहराकडे ग्राहकांचा कल आहे .आज मुबई ठाणे येथे घराचे भाव गगनाला भिडले असताना कल्याण डोंबिवली सहा आसपासच्या परिसरात मात्र भाव ग्राहकांच्या आवाक्यात आहेत .ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशी घरे देण्यासाठी विकासक प्रयत्नशील असतात असे स्पष्ट केले .पुढे बोलताना महापालिकेने ओपन ल्यांड टक्स कमी केला त्यामुळे विकासाकांवरील भर हलका झाला असून त्या मोबदल्यात एक्स्पो मध्ये पत्येक स्टोल वर घर बुकीगवर स्टंप ड्युटी माफ ,जी एसटी वर ६ टक्के सवलत, १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतची सूट, १ कार आणि १० टू व्हीलर्स लकी ड्रॉ द्वारे ,अशा काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील विकासात बांधकाम व्य्वासायीकांचा महत्वाचा वाटा आहे .रस्ते ,डिव्हायदर ,चौक सुशोभिकरण आदी कामे बिल्डर ने कोणतही अपेक्षा न ठेवता पूर्ण केली आहेत .विकासा बरोबर विकास आहेत .पुनरविकासकासाठी ४ चा एफ एस आय देंण्यात यावा अशी मागणी पाटील यांनी केली पुढे बोलताना मागील वृषो झालेल्या एकस्प्रो मध्ये एकूण १२५ घर बुक झाली होती यंदा किमान २५० घरे बुक होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
एमसीएचआयचे कल्याणात ८ वे एक्स्पो २४ ते २७ जानेवारी दरम्यान
January 18, 2019
23 Views
2 Min Read

-
Share This!