डोंबिवली : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गेली २५ वर्षे असलेली चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रक्तपेढी व फिजोथेरोपीसेंटरची जागा तीन दिवसात रिकामी करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. भाजपाच्या एका स्विकृत नगरसेवकांने या बाबत प्रशासनाला पत्र दिले आहे. भाजपाला एका खाजगी एजन्सीला या जागेत फिजोथेरोपी केंद्र सुरु करण्यासाठी ट्रस्टला जागा रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे आयुक्तांनी तोंडी आदेश दिले असल्याचे त्या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.
महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. राजू लवांगरे यांनी १६ जानेवारी १९ रोजी हा आदेश जारी केला आहे.चिदानंद ट्रस्ट व पालिका प्रशासन यांच्यात झालेल्या करारानुसार मुदत संपल्याचे निदर्शनाला आणले आहे.मात्र अद्यापही या जागा रिकामी करण्यात आलेल्या नाहीत. या संदर्भात आयुक्तांनी १६ तारखेला तोंडी आदेश दिले असून सदरची जागा त्वरित रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत असेही म्हटले आहे.तीन दिवसात जागा रिकामी न केल्यास प्रशासन या जागेला सिल करेल असेही बजावण्यात आले आहे.खास सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रीनगर रुग्णालयातील रक्तपेढीच्या जागेत भाजपाला एका एजन्सीला फिजोथेरोपी केंद्राला जागा द्यायची आहे, म्हणून प्रशासनाने हा प्रस्ताव आणला आहे. भाजपाच्या एका नगरसेवकाने तसे पत्र दिल्याचे समजते.यासंदर्भात चिदानंद ट्रस्टचे अध्यक्ष सुदीप साळवी यांना विचारले असता त्यांनीही याला दुजोरा दिला.आम्ही महापालिकेला जागेचे भाडे नियमित देत आहेात.गरजू रुग्णांना कमी किंमतीत रक्त पुरवठा केला जातो. प्रशासनाला जर रक्तपेढी नको असेल आम्ही जागा रिकामी करण्यास तयार आहोत असेही त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवलीच्या स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे यांना विचारले असता आम्ही रक्तपेढी आम्ही बंद करु देणार नाही असे स्पष्ट केले.भाजपाला तेथे एका एजन्सीला फिजोथेरोपी सुरु करायची असल्याचा आरोप त्यांनी मात्र अगदी नाममात्र दरात रुग्णालयात तळ मजल्यावर हे सेंटर आहेच याकडे त्यानी लक्ष वेधले.शिवसेना रकतपेढीला मुदत वाढ देइ्र्रल असेही त्यांनी सांगितले.