ठाणे (संतोष पडवळ ): परिचर्या क्षेत्रात शिक्षणासाठी पाठवणाऱ्या पालकांचे व या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थिनीचे कार्य कौतूकास्पद असून ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून कार्य करा अशा शुभेच्या महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सौ.मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या परिचारिका विद्यार्थिनीच्या शपथ ग्रहण सोहळ्यात विद्यार्थीनींना दिल्या .
या सोहळास सभागृह नेते नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त(१) राजेंद्र अहिवर, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्री डॉ.संध्या खडसे,माजी अधिष्ठाता डॉ. मधुकर जपे, आदीसह पालक उपस्थित होते.
यावेळी महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी संस्थचे २२ वर्षाचे कार्य गौरवास्पद असून प्रामाणिक व शिस्तबद्ध काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे महापालिका सदैव पाठीशी उभी आहे असे सांगितले.
दरम्यान नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी महापालिका तत्पर असून सौ.मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेसाठी नवीन इमारत देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी सांगितले.
शपथ ग्रहण सोहळा यशस्वी होण्यासाठी प्राचार्या प्राची धारप, उप प्राचार्या प्राजक्ता सामंत,नर्सिंग ट्युमर सुनिता गुरसाळे, शलाका कोळी,वर्षा पाटील यांनी विशेष कष्ट घेतले.