ठाणे

व्यायाम करताना २८ वर्षीय तरुणाचा करून अंत

ठाणे : ठाणे येथील एका ‘जीम’मध्ये व्यायाम करताना एका तरुणाचा (वय २८) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोल्ड नामक जीममध्ये व्यायाम करताना एका तरुणाची अचानक शुद्ध हरपली. त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात त्याला मृत घोषित केलं.

व्यवसायानं उद्योजक असलेले प्रतिक परदेशी अनेक दिवसांनंतर जीममध्ये व्यायाम करण्यासाठी आले होते. व्यायाम करताना अचानक त्यांची प्रकृती ढासळली. जीम व्यवस्थापनानं त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांची तब्येत आणखीनच खालावली. त्यानंतर परदेशी यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती नौपाडा पोलिसांकडून देण्यात आली. परदेशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं. प्रतिक परदेशी भाज्यांची होलसेल विक्री करत होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!