मुंबई : 20 जानेवारी 2019 रोजी झालेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई (बक्कल नं. 113370) साईगीता नाईक यांनी मुंबई महिला हाफ मॅरेथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. हाफ मॅरेथॉनचे 21 किलो मीटर अंतर पोशि साईगीता यांनी “1 तास 19 मिनिटे 01 पर सेकंद”मध्ये पार केले. हाफ मॅरेथॉनमध्ये राजस्थान पोलीस दलातील मीनू प्रजापती यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
यापूर्वी 2017 साली बंगळुरूमध्ये मॅरेथॉम स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक पटाकवला होता तर सन 2018 साली आसाममधील गुहाटी येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला होता.
मुंबई पोलीस खात्यातील जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावून मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये पोशि साईगीता नाईक यांनी अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
यावेळी वरिष्ठांनी पोशि साईगीती नाईक यांचे कौतुक केले.