नवी मुंबई : खारघर सेक्टर ३६ मधील सिडकोने बांधलेल्या स्वनपूर्ती गृह संकुलातील ओटले आणि अंतर्गत गाळे रद्द करण्याबाबत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची भूमिका सकारात्मक असल्याचे .काल झालेल्या स्वनपूर्ती मधील रहिवाशी आणि सिडको अधिकारी यांच्या उपस्थितीत .आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
खारघर सेक्टर ३६ मधील सिडकोने बांधलेल्या स्वनपूर्ती गृह संकुलामध्ये सिडकोने अंतर्गत गाळे आणि प्रवेशद्वारा जवळील ओटले विक्रीस काढले आहेत.याला स्वनपूर्ती मधील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. या बाबत येथील नागीकानी गेल्या दोन महिन्यांपासून विरोध करत सिडको अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला आहे .या बाबत दि १३जानेवारी २०१९ रोजी खारघर मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल मध्ये स्वनपूर्ती मधील रहिवाश्यानी सिडकोचे अध्यक्ष आम प्रशांत ठाकूर यांच्या सोबत एक मीटिंग आयोजित केली या ठिकाणी रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या या मध्ये अंतर्गत गाळे, ओटले,आणि सी सी टीव्ही या चर्चा केली.या वेळी आमदारांनी मी लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे अश्वासन दिले होते.
या बाबतीत काल आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी पाहणी दौरा केला आणि नंतर अधिकारी आणि येथील रहिवाशी यांच्या मध्ये एक मीटिंग घेतली.या वेळी.स्वनपूर्ती गृह संकुलातील ओटले आणि अंतर्गत गाळे रद्द करण्याबाबत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनि सकारात्मक भूमिका घेतली आणि जो पर्यंत हा प्रश्न निकाली लागत नाही तो पर्यंत ही प्रक्रिया थांबवा असे अधिकाऱ्यांना सांगितले.तसेच येत्या आठवड्यात सिडकोचे अधिकारी आणि स्वप्नपूरती मधील राहिवंशयाचे शिष्टमंडळ.यांची संयुक्त मीटिंग घेऊन तोडगा काढला जाईल असे अश्वासन दिले.या या वेळी भाजप चे रायगड जिल्हाउपाध्यक्ष वासुदेव घरत. भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल.सिडकोचे अधीकारी एस के कराड,लक्ष्मीकांत डावरे.श्रीकांत पोपणकार.आदी मान्यवर उपस्थित होते
स्वनपूर्तीच्या समस्येबाबत आमदार प्रशांत ठाकूर सकारात्मक
