ठाणे

अंतर्गत कुरबुरीला कंटाळून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षचा राजीनामा

डोंबिवली  :  ( शंकर जाधव ) गत पालिका निवडणुकीत मातब्बर नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्या नंतर कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षाची कमान सांभाळनाऱ्या जिल्हाध्यक्ष रमेश हनमंते यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्य्याकडे  राजीनामा सोपवला आहे.त्यांनी दिलेल्या पाच पाणी  राजीनामा सादर करत पक्षातील अंतर्गत कुरबुरी व अंतर्गत शह काट शहाच्या राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे नमूद करत नाव घेता स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला आहे.

            गत लोकसभा निवडणुकीपासून कल्याण डोंबिवली शहरात आपले अस्तित्व टिकवून ठेवलेल्या राष्ट्रवादीला घर घर लागली .विधानसभा व  पालिका निवडणुकीत मातब्बर नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेत्या विरोधात आगपाखड करत राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी दिली .त्याच दरम्यान  नंतर या पदासाठी अनेक वर्षापासून इच्छुक असलेल्या ह्न्मन्ते यांच्याकडे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली. त्यानंतर पक्ष उभारणी साठी कार्यकर्ते आनि पदाधिकाऱ्यांंची फळी उभारण्याची जबाबदारी पार पाडत होते .आधीच हाताच्या बोटावर उरलेल्या राष्ट्रवादी पक्षाकडून कार्य कर्त्या मध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी १४  तारखेला मेलाव्व्याचे आयोजन करण्यात आल्या नंतरया बैठकीसाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी स्वीकारण्या बरोबरच बैठकीच्या आयोजनाची धुरा संभळण्यासाठी कोणीही पदाधिकारी किंवा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते सरसावले नाहीत उलट आपण हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मैदान बुक करण्यापासून कार्यकर्ते गोळा करण्या पर्यत धडपड केली मात्र मात्र आयत्या वेळी ठाणे जिल्हा प्रभारी गणेश नाईक यांनीआपल्याला फोन करून स्भेसाठीचे मैदान ब्द्लण्याचे आदेश दिले मात्र आयत्या वेळी मैदान बदलणे शक्य नसल्याने आपण नकार दिला यामुळे आपला अपमान करण्यात आल्याचे सांगत हणमते यांनी आपला राजीनामा दिल्याचे म्हटले आहे .दरम्यान आपण पक्षाला नवसंजीवनी देण्याचे काम मागील ५ वर्षात केल्या नंतरही मेळाव्याच्या दरम्यान आपला अपमान करून पक्षातील काही लोकांच्या अंतर्गत  गटबाजी ,शह काट शहाचे राजकारण यामुळे आपला स्वाभिमान दुखावला आहे. यामुळेच आपण राजीनामा देत असल्याचा आरोप त्यांनी केला असला तरी त्यांनी कोणाचेही थेट नाव घेतलेले नाही.मेळावा संपल्या नंतर काही तासातच कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी आपल्या पदाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील याना धाडल्याने कल्याण डोंबिवलीतील उरल्या सुरल्या राष्ट्रवादीच्या गोटातील गटबाजी पुन्हां चव्हाट्यावर आली आहे..

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!