मुंबई

जागो… ग्राहक… जागो…! जागतिक ग्राहक दिनानिमित्त महाराष्ट्र सायबर पोलिसांचा अनोखा उपक्रम

मुंबई : ऑनलाईनच्या स्मार्ट जगात वाढणाऱ्या ऑनलाईन चोऱ्या, फसवणुकीला आळा लागण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलीस पथकाने नागरिकांसाठी अनोखा उपक्रम राबवला. या कार्यक्रमाचे आयोजन 22 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 ते 6 या वेळेत मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन ग्राहक मंचाने केले असून, महाराष्ट्र सायबरचे विशेष महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत, पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपधीक्षक विजय खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन रणदिवे, विवेक सावंत, महिला पोलीस शिपाई शिंदे व खोत या पोलिसांनी नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत माहिती दिली.
सायबर गुन्ह्यांना आळा घालणे नागरिकांच्या हातात आहे. काळजीपूर्वक ऑनलाईन व्यवहार, पासवर्ड, ओटीपी यांचा वापर करा. पासवर्ड, ओटीपी कोणाला सांगू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे खाते ज्या बॅंकेत असते त्या बॅंकेचे कर्मचारी तुम्हाला फोनवर खातेसंदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती विचारत नाही. खाते संदर्भात काही माहिती पाहिजे असल्यास बॅंकेत येऊ संपर्क साधा, एवढेच फोनवर बोलतात. अन्यथा तुमच्या नमूद पत्त्यावर पत्र पाठवून तसे कळवले जाते.
या कार्यक्रमाला सकाळपासून नागरिकांनी भेट देऊन सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली. जनजागृतीद्वारे उपयुक्त माहिती मिळाल्याने नागरिकांनी महाराष्ट्र सायबर पोलिसांचे आभार व्यक्त केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!