डोंबिवली :- ( शंकर जाधव ) शिवसेना नेते व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी रात्री ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे पार पडला.या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मिथक, मुंबई या संस्थेची ‘बेनिफिट ऑफ डाउट’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. याच एकांकिकेसाठी ओंकार राऊतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ‘रंगबावरी’साठी कांचन माळी हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ओक यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते उपस्थित होत्या. ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक, उदय सबनिस, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते, भारती पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
स्पर्धेच्या अंतिम फेरीचे प्रशिक्षक या नात्याने ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, नव्या पिढीचा दिग्दर्शक-अभिनेता अद्वैत दादरकर, विनायक दिवेकर, हर्षदा बोरकर आणि सुरेश मगरकर उपस्थित होते. याखेरीज पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते दिलीप बारटक्के, टॅगचे अध्यक्ष अशोक नारकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वा. सावरकर प्रतिष्ठान, जनसेवा प्रतिष्ठान, ठाणे आर्ट गिल्ड आणि शिवसेना चित्रपट सेना यांच्या सहआयोजनातून पार पडलेल्या या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मिथक, मुंबई या संस्थेची ‘बेनिफिट ऑफ डाउट’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. याच एकांकिकेसाठी ओंकार राऊतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ‘रंगबावरी’साठी कांचन माळी हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. रंगबावरी (सेंट गोंसालो गार्सिया महाविद्यालय, वसई) आणि एका दशावतार (रुईया महाविद्यालय, मुंबई) या एकांकिकांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक पटकावले. एका दशावतारसाठी प्राजक्त देशमुखने सर्वोत्कृष्ट लेखक आणि रणजीत पाटीलने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. आमचे आम्हीच, पुणे या संस्थेची ‘आय अॅॅग्री’ ही लक्षवेधी एकांकिका ठरली. प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेस रु. १,००,०००/- आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांकास रु. ७५,०००/- व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांकास रु. ५१,०००/- वस्मृतिचिन्ह, लक्षवे