ठाणे

मुरबाडमधील गोऱ्याचा पाडा येथील बोगस काम केलेल्या बेवारस मोरवीला पडलेल्या जीवघेण्या भगदाडाची थातुरमातुर दुरुस्ती करण्याचा ठेकेदाराचा केविलवाणा प्रयत्न…

 

मुरबाड (गितेश पवार) : मुरबाडमधील गोऱ्याचा पाड्या पासून बागेश्वरी तलावाच्या दिशेने जाणाऱ्या नव्याने बांधलेल्या एका बेवारस मोरवीला जीवघेणे भगदाड पडले असल्याची बातमी आमच्या न्युज चॅनेलने यापूर्वी प्रसिद्ध केली होती. तर याची दखल घेत आपण केलेल्या चुकीला लपवण्यासाठी संबंधित ठेकेदार व शासकीय विभागाने केविलवाणे प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसत आहे.

याकामात मोठ्या प्रमाणात डबर व मातीचा भरावा यांचा वापर करण्यात आल्याचे दिसत आहे. तर वरवर बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक व सिमेंट पाईप हा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा वापरण्यात आल्याचे उघड आहे.

मात्र मुरबाड तालुक्यातील भ्रष्ट अधिकारी वर्गामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व शासनाला लुटणाऱ्या ठेकेदारांना अभय मिळत असल्याने तालुक्यात दर्जेदार कामांचा अभाव असल्याचे नागरिक बोलत आहेत.

सदरचे बोगस काम तोडून नव्याने बांधण्यात यावे तथा संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत असतांना याच कामावर पडदा टाकण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र या कामाची कोणतेही खाते जबाबदारी स्वीकारत नसल्याने मुख्य दोषी खाते गुलदस्त्यात आहे. याबाबत दोषींवर कारवाई होई पर्यंत आमच्या चॅनेलचा पाठवपुरावा सुरुच राहणार असून सदरची धोकादायक निकृष्ट मोरवी नव्याने जबाबदारी पूर्वक बांधण्यात यावी यासाठी उच्च स्तरावर वरिष्ठांमार्फत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!