डोंबिवली :- दि.२४ ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महानगरपालिका महिला व बाल कल्याण समिती, सुभेदारवाडा कट्टा आणि माध्यमिक–उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त कल्याण मधील सुभाष मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमात कल्याणच्या शाळांमधील सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांनी १ लाख ३१ हजार ५७३ सामुहिक सूर्यनमस्कार घालून विक्रम केला. या कार्यक्रमासाठी आमदार नरेंद्र पवार, महापौर विनिता राणे, उप महापौर उपेक्षा भोईर, महिला व बाल कल्याण समितीचे सभापती रेखा चौधरी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे यावेळी खुद आमदार नरेंद्र पवार,महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्या खुशबु चौधरी,संगिता गायकवाड, दमयंती वझे, शिक्षक विलास निखारे यांनी देखील सुर्यनमस्कार घातले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक संघ कल्याणचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, सचिव अनिल पाटील , सरस्वती हायस्कुलचे अंकुश चौधरी , लुड्स हायस्कुलचे विलास वाघ,क्रीडा भारतीचे सचिव महादेव क्षिरसागर यांचेही सहकार्य लाभले.
कल्याणात दहा हजार विद्यार्थ्यांनी घातले सुर्यनमस्कार
January 24, 2019
16 Views
1 Min Read

-
Share This!