ठाणे : ठाणे जिल्ह्याचे अनभिषिक्त सम्राट गोरगरिबांचे तारणहार, २४ तास लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहून त्यांच्या अफाट कार्याची प्रचिती पाहून लोकांनी ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल केली तसेच आजही ज्यांचा फोटो देवाऱ्यात देवा सारखा आदराने पुजला जातो असे सर्वांचे लाडके स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री, आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते दिघे साहेबांच्या ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात करण्यात आले.यावेळी महापौर मीनाक्षीताई शिंदे, खासदार राजनजी विचारे साहेब, आमदार रविंद्र फाटक ठाणे ग्रामिण प्रमुख प्रकाश पाटील उपमहापौर रमाकांत मढवी आमदार शांताराम मोरे, माजी महापौर रमेश वैती सभागृह नेते नरेश म्हस्के तसेच *धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ धिर्डे, संपर्क प्रमुख रविंद्र खाडे सचिव गणेश चौधरी, उपाध्यक्ष चेतन बांगर, प्रसिद्धी प्रमुख पंढरीनाथ ढमके, मढ विभाग संपर्क प्रमुख चंद्रकांत गायकर, डोलखांब विभाग संपर्क प्रमुख कुमार कोंगेरे, आसनगाव विभाग संपर्क प्रमुख सलिम शेख, विलास दवणे, सचिन शेलार, अमोल जामघरे, व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या १० वर्षांपासून पहिल्यांदा धर्मवीर युवा ग्रुप, नतंर धर्मवीर आनंद दिघे साहेब युवा प्रतिष्ठानच्या नावाने शहापूर तालुक्यात कार्यरत होते आठवड्या भरापूर्वी प्रतिष्ठानचे रजिस्ट्रेशन *धर्मवीर युवा प्रतिष्ठान* या नावाने करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने दिघे साहेबांची जयंती, पुण्यतिथी तसेच प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रतिवर्षी श्री तीर्थक्षेत्र संगमेश्वर येथे भाविक भक्तांना मोफत फराळ वाटप, प्राथमिक आरोग्य केंद्र किन्हवली येथे रक्तदान शिबिर, सुशिक्षित बेरोजगारांसाठी शहापूर येथे भव्य रोजगार मेळावा, किन्हवली येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी, श्री तीर्थक्षेत्र टाकीपठार, बेडीसगाव, शेंद्रूण, शेणवा याठिकाणी आरोग्य शिबीरे राबवून हजारो लोकांनी लाभ दिला, परटोली – किन्हवली – मढ येथील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्य व फळ वाटप, रक्षाबंधन निमित्ताने डोलखांब (निमणपाडा) येथील विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तू, मुलांना शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप, शहापूर तालुक्यातील नागरिकांच्या महावितरण बाबतच्या (नवीन पोळ दुरुस्ती, नवीन बसविणे, लोंबकळलेल्या तारा ताणून घेणे) समस्यांवर निवेदन देऊन त्यांचा पाठपुरावा करून त्या समस्या यशस्वीपणे सोडविल्या आहेत.
दिघे साहेबांच्या आशीर्वादाने यापुढे प्रतिष्ठानच कार्य अखंडपणे चालू राहील. तळागाळात दिघे साहेबांच कार्य सामाजिक कार्य करून पोहचविण्यासाठी धर्मवीर युवा प्रतिष्ठान सदैव तत्पर राहील. युवा तरुण पिढीने प्रतिष्ठान मध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे. असे सांगण्यात आले.