ठाणे

औद्योगिक क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांसाठी “रात्र निवारा व अद्यावत रुग्णालय बांधावे” * भटके विमुक्त सामाजिक संस्थेची मागणी

अंबरनाथ दि. २८ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
           औद्योगिक क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांसाठी “रात्र निवारा व अद्यावत रुग्णालय बांधावे” अशी मागणी भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक – अध्यक्ष सुंदर नंदलाल डांगे यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अंबरनाथ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या अंतर्गत विविध कारखाने व उद्योगधंदे सुरू असून मोठया प्रमाणात कामगार वर्ग रोजगारासाठी ये-जा करतो. तसेच विविध प्रांतातून माल वाहतूक होत असल्याकारणाने वाहतुकदार (वाहनचालक) हे माल ने-आण करण्यासाठी येत असतात. परंतु, औद्योगिक महामंडळामार्फत त्यांची कुठल्याही प्रकारची मूलभूत सोयीने सुसज्ज अशी निवारा शेड नसल्याकारणाने संबंधित वाहनचालक व कामगार वर्गाची गैरसोय होत आहे. संबंधित प्रश्न हा गंभीर असून अल्प रोजंदारीवर काम करणारा कामगार वर्ग व वाहनचालक यांची फारच गैरसोय होत आहे. असेही भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या अंतर्गत “रात्र निवारा शेड व अद्यावत रुग्णालय” यासाठी औद्योगिक महामंडळाची जमीन संस्थेस अल्प भाडेदरात उपलब्ध करून दिल्यास सर्व सामान्यांची होणारी गैरसोय दूर होईल. “अद्यावत रुग्णालयात विविध क्षेत्रातील नामांकित वैद्यकिय अधिकारी मार्फत उपचार, कामगार व वाहनचालक यांना आराम करण्यासाठी निवारा शेड व स्नानगृह व स्वच्छतागृहाची निर्मिती करून संस्थेमार्फत सेवा पुरविणे, अद्यावत वाचनालयाची निर्मिती व देखरेख” अशा अनेक योजना प्रस्तावित असल्याचेही सुंदर डांगे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!