ठाणे : जिवंतपणीच़ मृत्यूचे खोटे दाखले तयार करून इन्शुरन्स कंपन्याना लाखो रुपयाचा चुना लावणाऱ्या सहा आरोपींना कल्याण क्राईम ब्रांचने अटक केली आहे ह्या मध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे .
कल्याण क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे यांच्या कडे या बाबतची तक्रार आली होती त्या अनुषंगाने तक्रारी मध्ये तथ्य दिसुन आल्या मुळे 15/01/2019 रोजी विठ्ठल वाडी पोलीस स्टेशनला 420,465,467,468,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला , क्राईम ब्रांच़चे सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरु केला , प्रथम त्यांनी चंद्रशेखर नरसिमलू शिंदे याला अटक केली , त्याच्या कडील माहीती वरून ठाणे महानगर पालिकेच्या मुंब्रा विभागातील स्मशान भूमीत काम करणाऱ्या तेजपाल रामवीर मेहरोल यास अटक करण्यात आली , याने त्याच्या ओळखीचे मुंब्रा येथील डॉ .अब्दुल मोईद सिध्दिकि व डॉ .ईम्रान सिध्दिकि यांच्या कडुन दहा जिवंत व्यक्तीचे व आंध्रप्रदेश राज्य येथे मयत झालेल्या तिन व्यक्तींचे खोटे म्रुत्यू अहवाल भरून सही करून घेउन त्याआधारे त्याने ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा आरोग्य विभाग येथुन म्रूत्यूचे खोटे प्रमाण पत्र काढुन चंद्र शेखर शिंदे याला दिले , खोट्या म्रुत्यू पत्राच्या आधारावर आरोपी चंद्रशेखर शिंदे , त्याचा मुलगा नारायण शिंदे सून लक्ष्मी नारायण शिंदे यांनी बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी व आदित्य बिर्ला सन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी यांची फसवणूक करून वीम्याच्या दाव्याची सुमारे 81 लाख रुपये रक्कम मिळवली असुन 55 लाख रुपये मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले , त्यांना अटक करून न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवस पोलीस कस्टडी दिली आहे .
इन्शुरन्स कंपन्यांना फसवणारे हे रकेट मोठे असुन या मध्ये इन्शुरन्स कंपन्यांचे कर्मचारी असण्याची सुध्दा शक्यता आहे, अजुन पाच ते सहा आरोपी यात अडकण्याची शक्यता आहे असे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगीतले .