अंबरनाथ दि. ३० (नवाज अब्दुलसत्तार वणू)
इंडिया फाऊंडेशन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कौटिल्य फेलोज प्रोग्राम अंतर्गत परराष्ट्र निती व पब्लिक रिलेशन या विषयावर १० दिवसीय कार्यशाळा १८ ते २८ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेसाठी तब्बल ५५ देशातील विद्यार्थी व संशोधक यांनी अर्ज केले असून राज्यशास्त्राच्या पदवीधर असलेल्या अंबरनाथच्या पायल कबरे यांची निवड करण्यात आली आहे.पायल कबरे या भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. नवी दिल्ली येथे होणाऱ्या या कार्यशाळेत अनेक खासदार, केंद्रीयमंत्री, फाँरेन डिप्लोमँट यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे. त्यात विशेष म्हणजे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे, केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू ते थेट परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे.